पक्षप्रमुखपद सोडतो म्हणणं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी… देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच डिवचलं – Marathi News | Devendra Fadnavis took a dig at Uddhav Thackeray, who had spoken of stepping down as party chief.


उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा फूट पाडण्याचा विडा एकनाथ शिंदे यांनी उचलला आहे. शिवसेनेचे सहा खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवरच १९ जून रोजी षण्मुखानंद हॉल येथे शिवसेनेचा हिरक महोत्सवी वर्धापन दिन साजरा झाला. या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांसमोर भावूक होत आपल्या राजीनाम्याचीही तयारी दाखवत शिवसैनिकांना आवाहन केले होते. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात शब्दात टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या ९ खासदारांपैकी ६ खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावत ‘ऑपरेशन टायगर’ केल्याने पक्षात अस्वस्थता आहे. याच खासदारांच्या फुटीच्या उंबरठ्यावर शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर जर मी पक्षाच्या अध्यक्ष पदावर असल्याने तुम्ही नाराज असाल तर मी हे पद या क्षणी सोडायला तयार आहे. पण कोणा गद्दाराला हे पद शिवसेना अध्यक्ष पद अजिबात मिळणार आहे. तुमच्यातील एखादा कार्यकर्ता पुढे येत असेल तर मी हे पद सोडतो, मला उलट त्याचा अभिमानच वाटेल असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी अक्षरश:डिवचणारे वक्तव्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनी पक्षाध्यक्ष पद सोडण्याच्या केलेल्या घोषणेबद्दल छेडले असता फडणवीस म्हणाले की ओसाड गावाची पाटलकी सोडू असं म्हणणं कितपत योग्य आहे. हे तुम्हीच ठरवा शिवसेना म्हणजे हा पक्ष नाही. तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे आणि तो संपत्तीचा वारसा नाहीए. तो विचारांचा वारसा आहे. तो विचारांचा वारसा त्यांनी सोडला, तो विचारांचा वारसा ज्यांना मान्य होता ते वेगळे झाले अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी डीवचले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *