Uddhav Thackeray: ‘कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..’ अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, ‘बुडाखाली खूर्ची आहे म्हणून…’


Uddhav Thackeray on Amit Shah: कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभा येऊन गेला, शिवसेना ही एकच आहे ती माझी आमची बाळासाहेबांची आहे. त्या उपऱ्याला कळालेलं नाही. भाजपला कोणीही अध्यक्ष चालतो हे तो उपरा विसरला. खुर्ची तुझ्या बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात. नुसता खुंटा लावला आहे, खालीवर काही नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. अमित शाह यांनी कोल्हापुरात शिवसेना आता एकच असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर आता फुटीर खासदार संजय दीना पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. 

खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का?

उद्धव ठाकरे म्हणाले की, मिंद्यांना विचारतो की तुमची दाढी वाढते का दाढी देखील भाड्याने घेतली आहे. जागा नसती मिळाली तर झाला असता का खासदार? अशी विचारणा त्यांनी केली. खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का? भवा नसता मिळाला. खायला सुद्धा भाव असायला लागतो. मिंधेला मंत्री आणि आमदार कोणी केले? अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, भाजपने पाठीत वार केला. ही जागा भाजप पुढील निवडणुकीत सोडणार आहे का? जर सोडणार असतील तर त्यांनी आत्ताच जाहीर करावं हा मतदारसंघ आम्ही एकनाथ शिंदे यांना देतो.  भाड्याने दाढी गाडी खुर्ची मिळेल.ठाकरे म्हणाले की, भाड्याने दाढी, गाडी खुर्ची मिळेल, पण जीवाला जीव देणारी माणसे मिळणार नाहीत.

शिवसेना आणि मशालीकडे पाहून मतदारांनी निवडून दिलं

ईशान्य मुंबई मतदारसंघावर बोलताना ते म्हणाले की, इथून जर पाहिलं तर शिवसैनिक नाही तर पेटलेल्या मशाली दिसत आहे. गद्दार आणि गद्दारांच्या बापांना मी धन्यवाद देतो की तुम्ही या मशाली पुन्हा पेटवल्या. वर्धापन दिनाच्या दिवशी जे बोललो आणि ते मी करणार आहे आणि त्यांची सुरुवात करत आहे. जिथे जिथे गद्दारी झाली तेथे मी जाऊन मतदारांची माफी मागत आहे. शिवसेना आणि मशालीकडे पाहून मतदारांनी निवडून दिलं. उमेदवार म्हणून निवडले होते आणि ती चूक म्हणून मी तुमची माफी मागतो. अनेकदा शिवसेना फोडली तोडली.  त्यांनी सांगितले की, ज्या भाजपला गल्लीतलं कुत्र विचारत नव्हतं तेव्हा त्याचं बोट धरून मोठं केलं. नाही, तर कोणीही विचारत नव्हते. अख्ख्या देशात फक्त दोन खासदार होते. स्वतःचं काहीच नाही, दुसऱ्यांची पोरं चोरून मोठी झालेली पार्टी आहे. काँग्रेसने कधीही शिवसेना चोरण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न केले नाही तो भाजपने केला. ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानात येऊन लढा, असे आव्हान त्यांनी दिले.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *