Y+ सुरक्षा घेतली याचा अर्थ लोकांचा तुमच्यावर राग, ओमराजे कसा भेदणार हा चक्रव्यूह? सुषमा अंधारेंचा सवाल


Sushma Andhare :  ओमराजे निंबाळकरांना 20 वर्ष न्यायचा लढा दिला पण त्यांना न्याय मिळाला नाही. अनेक काही गोष्टी घडल्या असतील, मांडणी कमी पडली असेल. त्यांच्यासोबत आमच्या भावना आणि सद्भावना आहेत असे मत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले. ओमराजे यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मेळावा घ्यायला पाहिजे होता. आता जाऊन आले, सह्या दिल्या हा मेळावा आधी घ्यायला पाहिजे होता असे अंधारे म्हणाल्या. त्यांची मानसिक अस्थिरता आहे. Y+ सुरक्षा घेतली याचा अर्थ तुमच्यावर लोकांचा राग आहे. लोक चिडले आहेत, ओमराजे हा चक्रव्यूह कसा भेदणार? असा सवाल अंधारेंनी केला. 

आष्टीकर यांनी दिलेली कारणे तकलादू 

नागेश आष्टीकर यांच्या सारख्या लोकांची आर्थिक कोंडी झाली आहे. निधीबाबत राजाभाऊ, अरविंद सावंत अनेक काँग्रेस आमदार खासदार यांचे सुद्धा मत आहे. औंढा नागनाथ स्मरून तुम्हाला वाटते का? दिल्लीत झालेल्या बैठकीत कोण कोण होतं हे आम्हाला माहिती आहे. 10 तारखेला झालेल्या बैठकीनंतर ताजमध्ये 6 जणांची बैठक झाली याचे सगळे व्हिडिओ आहेत. आष्टीकर यांनी दिलेली कारणे तकलादू आहेत. मान मिळत नव्हता मग उमेदवारी कशी मिळाली? असा सवाल अंधारे यांनी केला. मला धमक्या येतायेत, याबाबत मी पोलिसात तक्रार दिली आहे. 

खासदार बैठकीचे व्हिडिओ

लोकसभा सभापती यांच्यासोबत बसलेले, हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे व्हिडिओ असल्याची माहिती सुषमा अंधारे यानी दिली आहे. 4 महिन्यापासून हा निर्णय शिजत होता असे ही त्या म्हणाल्या. खासदार संजय दिना पाटील यांची कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेवक राजुल पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, आम्हाला या लोकांवर विश्वास नाही. त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल अंधारेंनी केला. खासदारांची पोरं आमच्यासोबत आहेत या भ्रमात आम्ही नाही असेही त्या म्हणाल्या. 

मी कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच माझा निर्णय : ओमराजे निंबाळकर

गेल्या दोन दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेवरुन मोठा गोंधळ उडाला आहे. मात्र, अद्यापही त्यांची राजकीय भूमिका तळ्यात की मळ्यात अशीच आहे. कारण, एकीकडे दिल्लीत ठाकरेंच्या  6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन झाल्याचं सांगितलं जात आहे. मी कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच माझा निर्णय घेईल, असे ओमराजे यांनी म्हटलं. त्यानंतर, प्रथमच त्यांनी एबीपी माझावर आपली भूमिका मांडली. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *