त्या दुर्दैवी दिवसाची आठवण सांगताना सिमरन म्हणाली, “एक दिवस सचिनने मला फोन करून त्याच्या घरी भेटायला बोलावले. मी त्याला सांगितले की, मी घरी माझ्या ४ वर्षांच्या लहान बहिणीला सांभाळत आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही. पण त्याने मला हट्ट करून सांगितले की, तू तुझ्या लहान बहिणीलाही सोबत घेऊन ये.”
