कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, फादर्स डे दिवशीच बाप-लेकीवर काळाचा घाला, परिसरात शोककळा


Pune Accident News : वडिलांच्या प्रेमाचा गौरव करणारा आजचा दिवस आहे. मात्र, आजच्या या फादर्स डेच्या दिवशी नियतीने बाप-लेकीचा अंत केल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. आनंद आणि उत्सवाचा दिवस या कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरली आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उदापूर इथं कल्याण–आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव वाहनांच्या भीषण धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र फादर्स डेच्या दिवशीच काळाने बाप-लेकींचा घात केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहतीनुसार, कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील उदापूर येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताने फादर्स डेच्या दिवशीच एका कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला आहे. 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *