Vaibhav Sooryavanshi: याला म्हणतात बदला! 400 च्या स्ट्राईक रेटने वैभवने श्रीलंकाला चोपले; केवळ 11 बॉलमध्ये इतिहास रचला – Marathi News | Vaibhav Sooryavanshi Tri Nation Series final with 94 off just 29 balls as India A took control against Sri Lanka A


श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद अर्धशतकाचा विश्वविक्रम मोडला. आता लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सूर्यवंशीने मागील विश्वविक्रम एका चेंडूने मोडला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा फलंदाज कौशल्या वीरारत्नेच्या नावावर होता, ज्याने 12 चेंडूंमध्ये हे यश मिळवले होते. सूर्यवंशीने 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. मागील सामन्यातील वादानंतर श्रीलंका ‘अ’ संघाच्या खेळाडूंविरुद्धचा त्रिकोणीय मालिकेचा अंतिम सामना हा वैभव सूर्यवंशीचा पहिलाच सामना होता.या सामन्यात वैभवने ज्याप्रकारे पहिल्याच चेंडूपासून श्रीलंकेच्या गोलंदाजांना लक्ष्य केले, त्याने केवळ विश्वविक्रमच मोडला नाही, तर सडेतोड प्रत्युत्तरही दिले. क्रिकेटमध्ये एक सामान्य म्हण आहे की, प्रत्युत्तर द्यायचे असेल तर बॅटने द्यावे, आणि वैभव सूर्यवंशीने आजच्या  दांबुल्लाच्या मैदानावर नेमके तेच करून दाखवले.

वैभव सूर्यवंशीचे वादळ

वैभव सूर्यवंशीने पाच षटकार आणि पाच चौकारांसह 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. आपल्या सर्वात वेगवान अर्धशतकादरम्यान, वैभवने सर्वप्रथम श्रीलंका ‘अ’ संघाचा गोलंदाज मोहम्मद शिराझला लक्ष्य केले. त्याने आपल्या अर्धशतकात मारलेल्या पाच चौकार आणि पाच षटकारांपैकी, चार आणि तीन षटकार एकट्या शिराझविरुद्धच होते. त्याने शिराझने टाकलेल्या भारत ‘अ’ संघाच्या डावातील तिसऱ्या षटकात 26 धावा ठोकल्या.

दांबुल्लामधील वैभव सूर्यवंशीचे कौशल्य केवळ शिराझपुरतेच मर्यादित नव्हते. त्याने श्रीलंका ‘अ’ संघाच्या उर्वरित गोलंदाजांनाही झोडपून काढले. वैभवने साहन, दुलाज आणि इतरांनाही झोडपण्यात कोणतीही कसर सोडली नाही. यादरम्यान, त्याने आणि त्याचा साथीदार प्रियांश आर्याने केवळ 8.5 षटकांत 132 धावांची सलामीची भागीदारी केली. या भागीदारीत, वैभवने एकट्याने 29 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 10 चौकारांसह 94 धावा केल्या.

श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीचे शतक हुकले असले तरी, त्याने आपले काम चोख बजावले. त्याने आपल्या संघासाठी असा पाया रचला, ज्यावर सहजपणे विजय उभा करता येईल. मागील सामन्यातील वादानंतर त्याने बॅटने दिलेले हे उत्तर श्रीलंकन संघाला चांगलेच लक्षात राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *