DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (20 जून) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्याकडून डी. के. शिवकुमार यांना शाल देत त्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. रश्मी ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.
Mumbai, Maharashtra: Karnataka Chief Minister D.K. Shivakumar leaves Matoshree, the residence of Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray, after a meeting that lasted around 30 minutes pic.twitter.com/dYAK0IiDJD
— IANS (@ians_india) June 20, 2026
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पुन्हा एकदा फुटीमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधान परिषद निवडणुकीमध्ये डीके शिवकुमार यांनी थेट भाजपचेच आमदार फोडत पाचवी जागा अशक्यप्राय असतानाही जिंकली. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दुसरीकडे या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा तपशील समोर आला नसला, तरी सद्य राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा केली. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतरडीके सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीच्या लग्नासाठी पोहोचले. आज राज्यासह देशभरातून रेवतीच्या लग्नासाठी नेतेमंडळी पोहोचले आहेत.
दुसरीकडे, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्नाटकात झालेल्या पहिल्या निवडणुकीत, सत्ताधारी काँग्रेसने विधान परिषदेच्या सातपैकी पाच जागा जिंकल्या, तर विरोधी भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केले, ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांनी विधान सौध निवडणुकीत मतदान केले. या सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजपने देशव्यापी दाखवलेला फंडा भाजपविरोधात वापरत डीकेंनी दणक्यात सुरुवात केली आहे.
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे थिप्पनप्पा कामकनूर, पी.व्ही. मोहन, बी.के. हरिप्रसाद (राज्य काँग्रेस अध्यक्ष), शिवण्णा बी.एस., विनय कार्तिक प्रकाश, भाजपचे लिंगराज पाटील आणि रघु आर., आणि जेडीएसचे गोविंदराजू यांचा समावेश आहे. काँग्रेसचे सर्व पाच उमेदवार आणि भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले, तर जेडीएसचे गोविंदराजू पराभूत झाले. विधान परिषदेच्या सात सदस्यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत असल्याने ही निवडणूक झाली होती. यामध्ये काँग्रेसचे नसीर अहमद, टिपन्नप्पा आणि बी. के. हरिप्रसाद, भाजपचे एन. नागराजू (एमटीबी), प्रताप एस. नायक के. आणि सुनील वल्लैयापूर, तसेच जेडीएसचे गोविंदराजू यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे