‘ऑपरेशन धमकी’, फुटीर खासदाराच्या माणसाकडून सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी, नंबरही समोर | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला आहे. पण, आता या वादाला वेगळंच वळण मिळालं आहे. 

News18
News18

मुंबई: शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार फुटल्याची चर्चा रंगली आहे. खासदारांच्या फुटण्यावरून ‘ऑपरेशन तुटवा’ असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. पण, असं असताना आता फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी फुटीर खासदार नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या माणसाचा फोन नंबरच अंधारे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

‘ऑपरेश टायगर’  राबवत शिंदे गटाने आता ठाकरे गटाचे ६ खासदार गळाला लावले आहे. या खासदारांचा प्रवेश अद्याप झाला नसल्यामुळे तुर्तास ब्रेक लागला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पेटला आहे. पण, आता या वादाला वेगळंच वळण मिळालं आहे.  फुटीर खासदार  नागेश आष्टीकरच्या माणसाने या फोन नंबर वरून आताच  मला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

“गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता खून करण्यापर्यंतची सवलत देणार आहे का? आष्टीकर मी तुमच्या धमकीच स्वागत करते, Challenge accepted, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी कडक शब्दात सुनावले आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *