Parbhani Yashwadi temple incident : परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहे. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली एकूण 23 जण दबल्याची माहिती मिळत होती. यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर आहे. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्याच आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या घटनेनंतर पुढील 3 दिवस यशवाडी हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मंदिराचे विश्वस्त स्वामी शिवेंद्र यांनी माहिती दिली आहे.
दुर्घटनेनंतर पुढील 3 दिवस हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद
यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर पुढील 3 दिवस हनुमान मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. मंदिराचे विश्वस्त स्वामी शिवेंद्र यांनी माहिती दिली आहे. घटनास्थळावरून सर्व मलबा काढून घेण्याचे काम सुरू राहणार आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळल्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांच्या दुखा:त आम्ही सहभागी असल्याची प्रतिक्रिया परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर अत्यंत दुख: व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्याच आल्याची माहिती मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.
यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण
यशवाडी हनुमान मंदिर परिसरातील बचाव कार्य पूर्ण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व 32 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. 32 पैकी 7 जणांचा मृत्यू तर 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. जिल्हाधिकारी संजय चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली. बचावकार्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन विभाग पाथरी, मानवत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय पथक महापालिका परभणी, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले.
दर शनिवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात
परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी हे प्रसिद्ध हनुमान देवस्थान आहे. राज्यभरातून भाविक दर्शनासाठी दर शनिवारी येतात. यशवाडी हनुमान मंदिर परिसरात अनेक विकास कामे सुरू आहेत. मंदिरच्या सभा मंडपाचे काम हे राजस्थानी दगड आणून करण्यात आले होते. त्याचे काम सुरूच होते अनेक ठिकाणी त्याला सपोर्ट लावण्यात आला होता. दुपारी तीन वाजून 2 मिनीटांनी अचानक हा सभा मंडप कोसळला. एकूण 32 जण अडकले गेले होते. यामधील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यांना बाहेर काढण्या तआलं आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. अडीच तासानंतर बचावकार्य पूर्ण झाले.
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे