सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात ‘बॉलिवूडच्या किंग’चा डान्स; रेवतीसोबत थिरकला शाहरूख खान | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Shah Rukh Khan At Supriya Sule Daughter Revati Wedding : शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा लग्नसोहळ्याला बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने हजेरी लावली.

News18
News18

माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा लग्नसोहळा सध्या सुरू आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या लग्नाला बड्या बड्या दिग्गजांनी उपस्थिती लावली. अगदी बॉलिवूडचा किंग शाहरूख खानही त्यांच्या लग्नसोहळ्याला आला आणि त्याने सोहळ्याला चारचाँद लावले.

सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळे ही लखानींच्या घरची सून झाली आहे. नागपूरचे प्रसिद्ध बिझनसमन अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानीसोबत तिने लग्नगाठ बांधली. आज 20 जून रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्यात शाहरूखने आपली जादू दाखवली.

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात शाहरूख खानने डान्स केला आहे. रेवतीचा हात थरून शाहरूख नाचला आहे. यावेळी त्याने त्याची आयकॉनिक पोझही दिली आहे. शाहरूखचा डान्स पाहून रेवती आणि सारंग दोघंही इम्प्रेस झाले. शेवटी शाहरूखने दोघांनाही हात मिळवत आणि दोघांनाही मिठी मारत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मानव मंगलानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

रेवती आणि सारंग यांच्याबाबत अधिक सांगायचं तर रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलंय. बारामती लोकसभा निवडणुकीत तिने पहिल्यांदाच सक्रीय राजकीय सहभाग घेत आईसाठी प्रचारही केला होता. तर सारंग अरुण लखानी हा बिझनसनचा मुलगा आणि  एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असून त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नात ‘बॉलिवूडच्या किंग’चा डान्स; रेवतीसोबत थिरकला शाहरूख खान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *