ओमराजे निंबाळकर यांचा अत्यंत मोठा निर्णय, शिंदेंना धक्का?, थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar made significant statement regarding Uddhav Thackeray and Aaditya Thackeray


पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा निकाल आला. या निकालात सर्व आरोपींना निर्दाेष मुक्तता देण्यात आली. हा ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का आहे. गेल्या 20 वर्षांपासून न्यायासाठी ओमराजे निंबाळकर झगडत आहेत. न्याय देवतेवर विश्वास असल्याचे त्यांनी निकालापूर्वीच सकाळी म्हटले. मात्र, त्यांना मोठा दणका बसला. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की, पुराव्या अभावी आरोपींची निर्दाेष सुटका होतंय. या निकालानंतर तात्काळ tv9 सोबत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, ते या प्रकरणात दिल्लीच्या कोर्टात जाणार आहे. सुरूवातीला हा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. मुंबई पोलिसांवर दबाव होता. त्यानंतर सीबीआयकडे हा निकाल वर्ग करण्यात आला. सीबीआयवरही दबाव होता. पवनराजे निंबाळकर प्रकरणात 20 वर्षांनी निकाल आल्यानंतर धाराशिवमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. थेट ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांनी बंदची हाक पुकारली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षाने व्हिप जारी केल्यानंतरही ओमराजे निंबाळकर बैठकीला हजर नव्हते. लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दिलेल्या पत्रात ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी कोर्टाच्या निकालानंतर म्हटले की, राजकीय भूमिकेबाबत मतदारसंघात जाऊन दोन ते तीन दिवसात निर्णय घेणार.

सहन केल्यावर आम्हाला न्यायाची अपेक्षा होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. मी माझी राजकीय भूमिका मतदार संघात गेल्यावरच स्पष्ट करेल. पुढे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले की, माझा निर्णय काही असला तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्याबद्दल कधीच बोललो नाही बोलणार नाही. मतदारसंघात जाऊन माझी भूमिका नक्की कळवेल.

माझी राजकीय भूमिका काहीही असली तरीही मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलणार नाही, यापूर्वीही बोललो नाही आणि भविष्यातही बोलणार नसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 5 खासदारांचे भविष्य यावरच आहे. शिवसेना ठाकरे गटातून ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी केलीये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *