देशांतर्गत सोन्याच्या भावात घसरण काय आहे. आज देशभरात सोन्याचे भाव आणखी घसरले आहेत, यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी, 20 जूनच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,46,000 पयांपर्यंत खाली आला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9% शुद्ध सोन्याच्या दरात 2840 रुपयांची मोठी घसरण होऊन तो प्रति 10 ग्रॅम 1,50,600 रुपयांवर स्थिरावला होता. प्रामुख्याने डॉलर वधारल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे; डॉलर इंडेक्सने गेल्या एका वर्षातील उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा (तात्काळ खरेदी-विक्रीसाठीचे सोने) व्यवहार प्रति औंस4148,45 डॉलर्सवर होत आहे.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
राजधानी दिल्लीत 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,46,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,33,840 रुपयांना मिळतंय. तर मुंबई आणि कोलकाता येते 22 कॅरेटच्या 10 ग्रॅमचा भाव 1,33,690 आणि 24 कॅरेटचा दर 1,45,850 रुपये इतका आहे.
चेन्नईत सोन्याचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून आले. 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं चेन्नईत 1,48,030 रुपयांना आणि 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,35,690 रुपये इतका आहे. तसेच पुणे आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेटचं सोनं 1,45,850 रुपये आणि 22 कॅरेट सोनं हे 1,33,690 रुपयांना आहे.
फेडरल रिझर्व्हचे अधिकारी केविन वॉर्श यांच्या विधानांवरून असे सूचित होते की, जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत राहिली, तर 2026 मध्ये व्याजदरात एकदा वाढ होऊ शकते. मात्र सोन्यासारख्या मौल्यवान धातूंसाठी ही एक नकारात्मक बाब आहे.
चांदीचे दर
आज सोन्याप्रमाणेच देशात चांदीचे दरही घसरले, 20 जून रोजी चांदीची किंमत घसरून 2,49,900 रुपये प्रतिकिलो ग्रॅम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीची किंमत प्रति औंस 64.73 डॉलर्स इतकी आहे.