विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. तरीही उष्णतेचा प्रभाव कायम असल्याने नागरिकांना दिलासा मिळालेला नाही.
