Ravindra Dhangekar on Eknath Shinde : ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) लागलेली मोठी गळती आता उघड झाली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार पक्षाचा व्हीप (Whip) धुडकावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आज शिवेसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत. एक शिवसेना ठाकरे गटाचा तर दुसरा शिवसेना शिंदे गटाचा आहे. दरम्यान, अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेरकर यांनी मोठं वक्तव्य केलं. आहे. ऑपरेशन टायगरनंतर आता पुढे बघा. लवकरच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्रीही होतील असं मोठं वक्तव्य रविंद्र धंगेकर यांनी केलं आहे.
आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन
आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे साजरे होत आहेत. या मेळाव्यात खासदार फुटीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर ऑपरेशन टागर बद्दल एकनाथ शिंदे काय बोलणार याकडं देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे.यावर बोलताना रविंदर धंगेकर म्हणाले की, संजय राऊत आणि सगळ्यांना आज एकनाथ शिंदे या मंचावरून नक्कीच उत्तर देतील.
एकीकडे शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण (Shivsena Foundation Day) होत असून त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा होत असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या आणि शिंदेच्या मेळाव्यात कोण कोण बोलणार याची यादी समोर आली आहे. त्यामुळे खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार आणि त्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. या दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आली असून शिवसैनिक जमायला सुरूवात झाली आहे.
शिंदेंच्या मेळाव्याला मोठी सुरक्षा
दरम्यान, राज्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन टायगरनंतर होणाऱ्या शिंदेंच्या मेळाव्याला मोठी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 300 ते 400 पोलीस कर्मचारी तैनात असून प्रत्येकाची कडक तपासणी केली जात आहे. त्याचवेळी या मेळाव्याला काळी कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. काळी कपडे घालून येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस माघारी पाठवत आहेत.
Shivsena Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटले?
1. संजय जाधव (परभणी)
2. संजय देशमुख (यवतमाळ– वाशिम)
3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं