Prasad Lad BEST Bus: मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपावर आमदार प्रसाद लाड संतापले, म्हणाले, ‘उबाठा अन् काँग्रेसची माणसं, मेस्मा लावा’


Prasad Lad on Mumbai BEST Bus Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबईत नाट्यमय घडामोडी घडत असतानाच बेस्ट कर्मचारी संपावर जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड आणि बेस्ट (Mumbai BEST Bus Strike) वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनचे कर्मचारी संपात सहभागी होणार नसल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात मोठ्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. याव बोलताना भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड म्हणाले कि, बेस्ट संप (BEST Strike Update) पूर्णपणे अनधिकृत आहे. अनधिकृतपणे बाहेरून गुंड आणून सर्वसामान्य कामगारांकडून परिस्तिथी चिघळवत आहे. मुंबईमध्ये परीक्षांचा काळ असताना, ऍडमिशनचा काळ असताना अशा पद्धतीमध्ये मुंबईकरांना धारेवर धरणं योग्य नाही. काही बसेसवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काही बसेस वरती दगड मारले गेले. ज्यांनी अशा प्रकारची कृती केली त्यांच्यावरती मेस्मा लावला पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे. सोबतच कंत्राटी बस रद्द करून त्याजागी बेस्टचे कर्मचारी घ्या, अशी मागणी हि प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे. तर या अनधिकृत संपामागे उबाठा, काँग्रेस आणि कॅम्युनिस्ट पक्ष असल्याचेही प्रसाद लाड म्हणाले.  (BEST Strike Update)

Prasad Lad : मुंबईकरांना धारेवर धरणं योग्य नाही, म्हणूनच उबाठा पक्षाला मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवली

संप पूर्णपणे अनधिकृत आहे. बेस्टमध्ये ज्या दोन संघटना आहे त्यात श्रमिक उत्कर्ष समिती आहे, ज्याचा मी अध्यक्ष आहे. दुसरी जी बेस्ट कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये शशांकरावजी हे शरद रावांची चिरंजीव हे अध्यक्ष आहेत. यात 90% बीएसटीचे ओरिजनल कर्मचारी आमच्याबरोबर आहे. काँग्रेस, उबाठा आणि कॅम्युनिस्ट पक्षाचा संघटनांकडून हे केलं जात आहे. या कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेलाय. यामुळे सामान्य लोकांना धारेवर धरण्याचा काम सुरु आहे. मुंबईमध्ये परीक्षांचा काळ असताना, ऍडमिशनचा काळ असताना अशा पद्धतीमध्ये मुंबईकरांना धारेवर धरणं योग्य नाही. म्हणूनच आतापर्यंत उबाठा पक्षाला मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवून दिली. परंतु काल कोर्टाने मेस्मा लावण्याचा निर्णय घेतलाय. मी आत्ताच पोलीस आयुक्तांची देखील बोललो. आमची लोक डेपो-डेपोमध्ये आहेत. काही ठिकाणी बस फोडण्याचा देखील काम केल्या गेलं. परंतु जशास तसे उत्तर देखील दिलं जाईल आणि मला वाटतं की आता आमच्या लोकांनी बसेस बाहेर काढायला सुरुवात केलेल्या आहे.

खरंतर चार हजार बस पैकी फक्त तीनशे बस ड्रायव्हर बीएसटीच्या आहेत. बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टवर आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की कॉन्ट्रॅक्टर बस टर्मिनेट करून तात्काळ बीएसटी कर्मचारी त्या बसेसवर घेतले पाहिजे आणि अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग, हे मुंबईकरांना वेठीस रण्याचे जे काम करतात ते कुठेतरी थांबले गेले पाहिजे. माझी काल देखील बातचीत झाली.

Prasad Lad  : गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काही बसेस वरती दगडफेक

शाशंकराव यांचीशी आता देखील सकाळी सहा वाजल्यापासून सातत्याने मी बोलत होतो त्यामुळे मला पंधरा-वीस मिनिटे खाली उतरायला उशीर झाला परंतु आता परिस्थिती निवडत आलेली आहे सकाळी साडेपाच सहा वाजता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काही बसेस वरती दगड मारले गेले परंतु कर्मचारी न घाबरता आता मुलुंड डेपो असेल, वडाळा असेल, कुर्ला असेल धारावी असेल बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांनी बसेस बाहेर काढण्यास सुरू केले आहे. मला वाटतं की येणार एक दोन तासात संपूर्णपणे हे परकरण निवळेल. मात्र अशा लोकांवर 100% कारवाई केली पाहजे.

Prasad Lad : अशा प्रकारची कृती केली त्यांच्यावरती मेस्मा लावला पाहिजे

ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची कृती केली त्यांच्यावरती मेस्मा लावला पाहिजे. ज्यांची संघटना नाही ते अनधिकृतपणे गुंड बाहेरून आणून सर्वसामान्य कामगारांकडून परिस्तिथी चिघळवत आहे. मी देखील अनेक कामगार नेतृत्वाशी बोलालो. आमचे बस डेपोतमध्ये डेपोचे इन्चार्ज आहेत, त्याला डेपो मॅनेजर म्हणतात त्यांच्याशी देखील मी बोलतोय आणि लोकांना बाहेर काढण्याचा आम्ही काम करतो.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; प्रमुख मागण्या नेमक्या काय? (BEST employees strike, What exactly are the key demands)

– बेस्ट सेवांचे कंत्राटीकरण थांबवा

-बेस्ट मालमत्तांचा पीपीपी तत्वावर पुनर्विकासाला विरोध

– बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा

-निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी द्या

-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *