Mithun Chakraborty Daughter Fiance Myles Mantzaris: मिथुन चक्रवर्तींच्या घरात लवकरच घुमणार सनई-चौघड्यांचे सूर; होणाऱ्या जावयाचं बॉलिवूड नाहीतर थेट हॉलिवूडशी कनेक्शन, ओळखलं का कोण?


Mithun Chakraborty Daughter Dishani Chakraborty Fiance Myles Mantzaris: ऐंशीच्या दशकातला एक असा अभिनेता, ज्यानं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना दिलेली काँटे की टक्कर. बिग बींचं (Big B) स्टारडम पुरतं हादरवून सोडलं होतं. या अभिनेत्याला ‘सिंगल स्क्रीनचा रिअल हिरो’ (Real Hero Of The Single Screen) असा टॅगही दिला होता. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हिंदी चित्रपटसृष्टीचा (Hindi Film Industry) ‘डिस्को डान्सर’, म्हणजेच, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty). एकेकाळी सिल्वर स्क्रिनवर राज्य करणारे मिथुन दा आता लवकरच सासरेबुआ होणार आहेत. त्यांच्या घरात लवकरच सनई-चौघड्यांचे सूर दुमदुमणार असून त्यांच्या लेकीची लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. 

मिथुन चक्रवर्ती यांची लेक, दिशानी चक्रवर्ती (Dishani Chakraborty) हिचा तिचा बॉयफ्रेंड माइल्स मँटजारिस याच्याशी साखरपुडा झालाय. दिशानीनं सोशल मीडियावर तिच्या या स्वप्नवत प्रपोजलचे फोटो शेअर करताच, तिचा होकार मिळवणाऱ्या तरुणाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. सुंदर असा समुद्रकिनारा, अवती-भवती मेणबत्त्या आणि फुलांचा सडा, असा सिनेमातल्या सीनसारखा प्रसंग मिथुन चक्रवर्ती यांच्या लेकीच्या आयुष्यात खराखुरा घडला. माइल्स मँटजारिस यानं दिशानीला लग्नासाठी गुडघ्यावर बसून मागणी घातली आणि दिशानीनंही त्याला होकार दिलाय. पण, मिथुन चक्रवर्ती यांचा होणारा जावई नेमका कोण? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Mithun Chakraborty Daughter Fiance Myles Mantzaris: मिथुन चक्रवर्तींच्या घरात लवकरच घुमणार सनई-चौघड्यांचे सूर; होणाऱ्या जावयाचं बॉलिवूड नाहीतर थेट हॉलिवूडशी कनेक्शन, ओळखलं का कोण? 

मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलीला घातली लग्नाची मागणी (Mithun Chakraborty’s Daughter Marriage Proposal)

दिशानी आणि माइल्सचा साखरपुडा एखाद्या रोमँटिक सिनेमातील सीनपेक्षा कमी नव्हता. कॅलिफोर्नियातील मालिबू येथील निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर माइल्सनं गुडघ्यावर बसून दिशानीला लग्नाची मागणी घातली. हा क्षण अधिक अविस्मरणीय करण्यासाठी ती जागा मेणबत्त्या आणि सूर्यफुलांनी अतिशय सुंदररीत्या सजवण्यात आली होती. हे फोटो समोर येताच चाहते आणि सेलिब्रिटींनी या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केलीय.

मिथुन चक्रवर्ती यांचा होणारा जावई कोण? (Who Is Mithun Chakraborty Future Son-In-Law?)

सुपरस्टार बापाची लेक असलेली दिशानी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध सेलिब्रिटी कुटुंबातली लाडकी असली तरीसुद्धा या कुटुंबाचा होणारा जावईसुद्धा काही कमी नाही. माइल्स मँटजारिस इंटरनॅशनल इंडस्ट्रीत काम करणारा एक क्रिएटिव्ह प्रोफेशनल आहे. तो फ्रीलांस सिनेमेटोग्राफर, स्टेडीकॅम ऑपरेटर, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी आणि कलरिस्ट म्हणून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. आतापर्यंत कॅमेऱ्याच्या मागे राहून त्यानं अनेक मोठे आणि बिग बजेट प्रोजेक्ट हाताळले आहेत. 

शिक्षणानंतर स्वतःची वेगळी ओळख केलीय निर्माण 

माइल्सनं 2020 मध्ये इथाका कॉलेजमधून ‘सिनेमा प्रॉडक्शन’चं शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर तो लॉस एंजेलिसला गेला आणि मनोरंजन क्षेत्रात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. काही काळ नियमित नोकरी केल्यानंतर, त्यानं ‘फ्रीलान्स’ क्षेत्रात पाऊल टाकलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली.

दिग्गज संस्थांसोबत काम

माइल्सचा व्यावसायिक प्रवास अत्यंत रंजक राहिलाय. त्यानं पॅरामाउंट पिक्चर्स (Paramount Pictures), एनएफएल (NFL), ईएसपीएन (ESPN), फेसबुक (Facebook) आणि यूएफसी (UFC) यांसारख्या नामांकित ब्रँड्स आणि संस्थांसोबत काम केलंय. याव्यतिरिक्त, त्यानं म्युझिक व्हिडीओ, जाहिराती आणि सोशल मीडियावरील कंटेंट यांसारख्या विविध प्रोजेक्ट्समध्येही योगदान दिलंय.

दिशानीसोबत बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये माइल्स मँटजारिस

दिशानी आणि माइल्स यांनी नेहमीच आपल्या नात्याला लाइमलाइटपासून दूर ठेवलंय. तरीही, सोशल मीडियावर अधूनमधून त्यांची झलक पाहायला मिळाली आहे. आता त्यांच्या साखरपुड्यानंतर, चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपं 6 डिसेंबर 2026 रोजी विवाहबंधनात अडकू शकतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Struggle Life: विनोद खन्ना नाही, ‘या’ सुपरस्टारनं हादरवलेलं अमिताभ बच्चन यांचं स्टारडम; एका दिवसाचे घ्यायचा एक लाख, ‘सिंगल स्क्रिनचा रियल हिरो’चा मिळवलेला टॅग

ABP Majha च्या बातम्या LIVE



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *