Hardik Pandya Fined : मैदानावर जे घडलं कॅमेऱ्यात ते सगळं कैद झालं! हार्दिक पांड्यावर BCCIची मोठी कारवाई; नेमकं कोणत्या चुकीची मिळाली शिक्षा?


KKR vs MI IPL 2026 Hardik Pandya Fined : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या आचारसंहितेच्या लेव्हल-1 उल्लंघनासाठी त्याच्या मॅच फीपैकी 10 टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जमा करण्यात आला आहे. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात कॅच सुटल्याने आणि सलग चौकार गेल्यानंतर हार्दिकचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने विकेटच्या बेल्स जोरात फेकून दिल्या.

बीसीसीआयने अधिकृत निवेदनात म्हटलं की, हार्दिक पांड्याने आयपीएल आचारसंहितेतील कलम 2.2 चे उल्लंघन केलं आहे. हे कलम सामन्यादरम्यान क्रिकेट साहित्य, मैदानावरील उपकरणे किंवा फिक्स्चरचा गैरवापर करण्यासंदर्भात आहे. हार्दिकने आपल्या रन-अपने परत जाताना विकेटच्या बेल्सवर जोरात हात मारला होता.

हार्दिक नेमका का भडकला?

कोलकात्याच्या डावातील दहाव्या षटकात मुंबईच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे हार्दिक चांगलाच संतापला होता. त्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोव्हमन पॉवेल याने हवेत फटका मारला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर हा सोपा झेल होता, मात्र दीपक चहर आणि रॉबिन मिन्झ यांच्या गोंधळामुळे झेल सुटला. हा झेल प्रत्यक्षात चाहरचा होता, पण मिन्झ झेल घेईल असा समज झाल्याने त्याने प्रयत्नच केला नाही. यानंतर लगेचच मनीष पांडे याने सलग दोन चौकार ठोकले आणि त्यानंतर हार्दिकचा संयम सुटला.

हार्दिकने स्वतःची चूक मान्य केली असून मॅच रेफरीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. दुखापतीमुळे तो मागील काही सामन्यांत खेळला नव्हता. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे.

4 विकेट्सनी मुंबईचा पराभव

मुंबई इंडियन्सची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी ठरली. रायन रिकल्टन 6, रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाले. नमन धीर खातेही उघडू शकला नाही, तर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने 15 धावा केल्या. तिलक वर्मा याने 20, तर हार्दिक पांड्याने 26 धावांचे योगदान दिले. अखेरीस कॉर्बिन बॉशने 18 चेंडूत 32 धावांची झुंजार खेळी करत मुंबईला 147 धावांपर्यंत पोहोचवलं. 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मनीष पांडेने 33 चेंडूत 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात तो पहिल्यांदाच फलंदाजीला उतरला होता. रोवमॅन पॉवेलने 30 चेंडूत 40 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सने 7 चेंडू राखून 4 विकेट्सनी विजय मिळवला.

हे ही वाचा –

BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *