Cockroach Janata Party Follow By Bollywood Celebrity: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janata Party), जर तुमचा सोशल मीडिया (Social Media) आणि इंटरनेटच्या जगाशी किंचितही संबंध असेल, तर गेल्या काही दिवसांत हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तुम्हाला कदाचित हा प्रश्नही पडला असेल की, नक्की हे प्रकरण आहे तरी काय? अनेकांनी या प्रोफाइलकडे एक शुल्लक गोष्ट म्हणून दुर्लक्ष केलं. पण, हे जाणून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की, अवघ्या सहा दिवसांतच ‘कॉकरोच जनता पार्टी’नं 13 मिलियनहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केलाय. सोशल मीडियावरच्या समर्थनाच्या लाटेत या गटानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ‘भारतीय जनता पार्टी’कडे असलेल्या 8.7 मिलियन फॉलोअर्सच्या संख्येलाही मागे टाकलंय. विशेष म्हणजे, सामान्य युजर्ससोबतच, ‘व्यंग्यात्मक राजकीय चळवळीला’ अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. दिया मिर्झा (Dia Mirza) आणि कोंकणा सेन शर्मा यांच्यापासून ते अनुराग कश्यपपर्यंत (Anurag Kashyap), अनेकजण या पेजला फॉलो करत आहेत.
‘कॉकरोच जनता पार्टी’ म्हणजे नेमकं काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना कथितरित्या ‘झुरळांशी’ (Cockroaches) केल्यानंतर, सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या विश्वात सुरू करण्यात आलेला हा एक ‘व्यंग्यात्मक राजकीय ग्रुप’ आहे. हा ग्रुप रातोंरात व्हायरल झाला आणि पाहता पाहता या ग्रुपनं संपूर्ण इंटरनेटवर धुमाकूळ घातला.
इंस्टाग्रामवर कोणत्या राजकीय पक्षाचे किती फॉलोअर्स?
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : 13.3M
- भारतीय जनता पार्टी : 8.7M
- आम आदमी पार्टी : 1.9M
- समाजवादी पार्टी : 870K
- तृणमूल कांग्रेस : 537K
- जनता दल यूनाइटेड : 416K
Cockroach Janata Party चे सेलिब्रिटी फॉलोअर्स
Cockroach Janata Party च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजनं सुरुवातीला 30 लाख फॉलोअर्स मिळवले होते. मात्र, गेल्या सहा दिवसांत याची लोकप्रियता वणव्यासारखी वेगाने पसरली आहे. या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करणाऱ्या नामांकित सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा, चित्रपट निर्माता अनुराग कश्यप, अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा, ईशा गुप्ता, ‘बिग बॉस’ फेम उमर रियाझ, अभिनेता अभिषेक निगम, उर्फी जावेद, नगमा मिराजकर, इन्फ्लुएन्सर पूरव झा, टीव्ही अभिनेत्री शफाक नाझ आणि शीझान खान, तसेच इतर अनेक दूरचित्रवाणी कलाकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि पंजाबी गायिका-अभिनेत्री हिमांशी खुराणा हे देखील या सोशल मीडिया ट्रेंडमध्ये सहभागी झाले आहेत.
‘कॉकरोच जनता पार्टी’ला फॉलो करणारे सेलिब्रिटी
- अनुराग कश्यप (Anurag Kashyap)
- दीया मिर्झा (Dia Mirza)
- विशाल ददलानी (Vishal Dadlani)
- फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh)
- कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma)
- ईशा गुप्ता (Esha Gupta)
- उमर रियाज (Umar Riaz)
- अभिषेक निगम (Abhishek Nigam)
- उर्फी जावेद (Urfi Javed)
- नगमा मिराजकर (Nagma Mirajkar)
- पूरव झा (Purav Jha)
- रौनक रजानी (Raunaq Rajani)
- शफाक नाज (Shafaq Naaz)
- शीजान खान (Sheezan Khan)
कॉकरोच जनता पार्टी नेमकं आहे तरी काय?
‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ही एक ‘व्यंग्यात्मक राजकीय चळवळ’ आहे. सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर, अलिकडेच या गटाची सुरुवात ऑनलाइन माध्यमातून करण्यात आली. काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना चक्क झुरळांशी केली होती. अवघ्या काही दिवसांतच, ही पार्टी Gen Z तरुणाईसाठी इंटरनेटवरील एक नवा ट्रेंड बनली. इन्स्टाग्राम रील्स, ट्विटर आणि विविध ‘मीम पेजेस’वर, देशातील तरुण-तरुणी कॉकरोच जनता पार्टीला फॉलो करू लागले आहेत. इतकंच नव्हे, तर स्वतःच्या काही अत्यंत विचित्र सवयींचा दाखला देत, ते या पक्षातील नेतृत्वपदे आणि विविध पदांसाठी स्वतःला पात्र उमेदवार असल्याचंही जाहीर करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा