नवी दिल्ली : फ्रान्समधील एवियन येथे आयोजित G7 परिषदेच्या (G7 Summit 2026) पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात एक अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक (Bilateral Meeting) पार पडली. या बैठकीदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या सुरक्षेबाबत एक ऐतिहासिक आणि मोठे विधान केलं आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत भारतावर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असं आश्वासन ट्रम्प यांनी दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले की, “आमच्यामध्ये कोणताही लिखित करार (Written Agreement) नसला, तरीही अमेरिका भारताला पूर्ण सहकार्य करेल. मात्र, जर भारतामध्ये दुसरा कोणताही पंतप्रधान असेल, तर मी याबद्दल खात्री देऊ शकत नाही.”
#WATCH | Evian, France | On India-US defence relations, US President Donald Trump says, “I think it is a great relationship…If they were attacked, we would be there to help them…If anybody attacks that man, we are going to be there…If they are attacked and he (PM Modi) is… pic.twitter.com/45pjpLY39e
— ANI (@ANI) June 17, 2026
India US Maritime Security : ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’चा मुद्दा
या बैठकीदरम्यान दोन्ही जागतिक नेत्यांमध्ये ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) येथे झालेल्या अमेरिकन हल्ल्यात तीन भारतीय नाविकांच्या (Indian Sailors) झालेल्या मृत्यूवरही महत्त्वाची चर्चा झाली. यावर बोलताना ट्रम्प म्हणाले, “मी या दुर्दैवी घटनेबद्दल ऐकले आहे. हे अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण काम आहे. आम्ही या प्रकरणावर गांभीर्याने काम करत आहोत.”
दुसरीकडे, संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर तैनात असलेल्या लाखो भारतीय नाविकांच्या सुरक्षेचा (Sailors Security) मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’सारख्या संवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नाविकांची सुरक्षा ही भारतासाठी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
PM Modi on US Iran Peace Deal : अमेरिका-इराण शांतता कराराचे कौतुक
पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले की, “पश्चिम आशियात शांतता राखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या (US-Iran Peace Deal) प्रगतीचे मी स्वागत करतो. मला पूर्ण विश्वास आहे की हा करार लागू करताना भारतीय नाविकांच्या सुरक्षेच्या मुद्द्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल.”
या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक आणि सामरिक संबंध (India US Strategic Relations) आगामी काळात अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ही बातमी वाचा:
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद