IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला 170 धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकली – Marathi News | IND vs AFG 2nd ODI India defeated Afghanistan by 170 runs in the second ODI winning the series 2 0


IND vs AFG 2nd ODI : भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानला धावांनी नमवलं, मालिका 2-0 ने जिंकलीImage Credit source: BCCI Twitter

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना भारताने 170 धावांनी जिंकला. भारताने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 402 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 403 धावांचं आव्हान दिलं होतं हे आव्हान काही अफगाणिस्तानला गाठता आलं नाही. अफगाणिस्तानचा संपूर्ण 232 धावांवर बाद झाला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका सलग दोन विजयानंतर 2-0 ने खिशात टाकली. त्यामुळे तिसरा वनडे सामना हा औपचारिक असणार आहे.

भारताने विजयासाठी 402 धावांचा पाठलाग करताना रहमनुल्ला गुरबाज आणि इब्राहिम जाद्रान यांनी चांगली सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. रहमनुल्लाह 41 धावा करून बाद झाला. त्यानंतर इब्राहिम जाद्रान 21 धावांवर तंबूत परतला. तर सेदिकुल्लाह अटलचा खेळही 42 धावांवर संपला. एकीकडे रहमत शाह झुंज देत असताना दार्विश रसूल रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतला.  तो 6 धावांवर खेळत होता. हशमतुल्लाह शाहिदी 4, नांगेयालिया खरोटी 6, रशीद खान 12 आणि एएम घझनफर 1 धाव करून तंबूत परतले. रहमत शाहने 89 चेंडूत 79 धावांची झुंजार खेळी केली. पण विजय खूपच दूर होता. त्याच्याकडे शतकी खेळी करण्याची संधी होती. पण प्रिंस यादवनेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात अर्शदीप सिंगने 3, गुरनूर ब्रारने 3, प्रिन्स यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली.

या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या संधीचा भारतीय संघाने पुरेपूर फायदा उचलला आहे. सलमीला आलेला यशस्वी जयस्वाल 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही 48 धावा तंबूत परतला. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन यांचा झंझावात पाहायला मिळाला. या दोघांनी शतकी खेळी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी 140 चेंडूत 224 धावांची भागीदारी केली. शुबमन गिलने 110 चेंडतू 22 चौकार आणि 2 षटकार मारत 154 धावा केल्या. तर इशान किशनने 79 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकार मारत 125 धावा केल्या. श्रेयस 26 धावा करून तंबूत परतला. तर केएल राहुलला खातंही खोलता आलं नाही. या व्यतिरिक्त तळाचे फलंदाज काही खास करू शकले नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *