कारची तीन दुचाकीस्वरांना धडक, एकाचा जागीच मृत्यू, मुंबईतील विलेपार्लेत भीषण अपघात


Mumbai Accident News : मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोडवरील मोगीबाई मार्केट परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास इलेक्ट्रिक कारने तीन दुचाकीस्वारांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. किंजल हिरेन शहा (वय 41) असं त्यांचं नाव आहे. यामध्ये कार चालक विलास श्रीधर गव्हाणकर (वय 44) याच्यावर निष्काळजी व बेदरकार वाहन चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

जखमींवर गावडे रुग्णालयात उपचार सुरु

विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोडवरील मोगीबाई मार्केट परिसरात भीषण अपघात झाला आहे. कारने तीन दुचाकीस्वरांना धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. किंजल हिरेन शहा यांचं निधन झालं आहे. तर निर्मला डोजीया आणि प्रेमजी डोजीया हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर गावडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रेल्वे स्टेशन रोडवरील वाहतुकीच्या गर्दीत हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *