…तर उद्याच मी दिल्लीला जाणार; ठाकरे गटाच्या मुंबईत असलेल्या खासदाराचं मोठं वक्तव्य, नेमके आता किती खासदार शिंदेंच्या संपर्कात? – Marathi News | MP Sanjay Dina Patil is still in Mumbai will he leave the Shiv Sena Thackeray faction or not


शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट Image Credit source: टीव्ही 9 मराठी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. 9 पैकी 6 खासदार पक्षातून फुटले आहेत. आता फक्त तीनच खासदार हे उद्धव ठाकरेंसोबत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे तीन खासदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. दरम्यान रविवारीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. या बैठकीला 9 पैकी फक्त 4 खासदाराच प्रत्यक्ष उपस्थित होते.  तर 5 खासदार हे व्हिसीद्वारे हजर असल्यचं बोललं जात होतं. दरम्यान तेव्हापासूनच हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचं बोललं जात होतं.

अखेर आता चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. नवा गट स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे सर्व खासदार कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत अजूनही संस्पेस कायम असला तरी देखील ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे जे खासदार फुटले आहेत, त्यामध्ये खासदार संजय दिना पाटील यांचा देखील समावेळ आहे.

खासदार संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघाचे खासदार आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय दिना पाटील हे मुंबईतच आहेत. सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा विवाह आहे, त्याची जबाबदारी ही संजय दिना पाटील यांच्यावर असल्यानं ते या लग्नामध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आज दिल्लीला बोलावणे होते,  मात्र जर खापर फुटत असेल तर उद्याच दिल्लीमध्ये जाणार असंही त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात माध्यमांनी वरिष्ठ नेते संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्याशी बोलावं असंही त्यांनी म्हटलं आहे.  हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे, या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.  शिवसेना ठाकरे गटाचे एकूण सहा खासदार  फुटल्याची माहिती समोर येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *