June 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जूनचे शेवटचे 15 दिवस गेमचेंजर! 5 राशींवर कुबेराची कृपा, पैसा नोकरी, प्रेम.. राशीभविष्य


June 2026 Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, जून (June 2026) महिना अत्यंत खास आहे. या महिन्यात अनेक ग्रह-तारे-नक्षत्रांच्या हालचाली होताना पाहायला मिळत आहे. तसं पाहायला गेलं तर आता जूनचे शेवटचे 15 दिवस शिल्लक आहेत, ज्योतिषींच्या मते, या काळात गुरूचे संक्रमण, ग्रहांचे शुभ योग आणि महिनाअखेरीस सुरू होणारा बुध वक्रीचा प्रभाव अनेक राशींवर होणार आहे, या  महिन्याचे शेवटचे 15 दिवस कसे असतील? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. यासाठीच आपण तूळ ते मीन राशींचं जूनच्या शेवटच्या 15 दिवसांचं राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत.

तूळ रास (Libra June 2026 Monthly Horoscope)

तूळ राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ नशीबाची चांगली साथ मिळेल. नवीन योजना आणि प्रकल्प यशस्वी होऊ शकतात. आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाचे योगही संभवतात.

वृश्चिक रास (Scorpio June 2026 Monthly Horoscope)

वृश्चिक राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मनावरील ताण कमी होईल. नोकरीत सकारात्मक बदल दिसतील. व्यवसायात आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबीयांशी संबंध अधिक मधुर होतील. आरोग्यात सुधारणा होईल. आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल.

धनु रास (Saggitarius June 2026 Monthly Horoscope)

धनु राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ भाग्योदयाचा ठरू शकतो. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात विस्ताराची योजना यशस्वी होईल. आर्थिक लाभाचे मजबूत योग आहेत. प्रेमजीवन आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.

मकर रास (Capricorn June 2026 Monthly Horoscope)

मकर राशीसाठी 17 ते 30 जूनचा काळ कठीण परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. नोकरीत पद, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. कुटुंबातील समस्या दूर होतील. आरोग्य चांगले राहील.

कुंभ रास (Aquarius June 2026 Monthly Horoscope)

कुंभ राशींसाठी 17 ते 30 जूनचा काळ आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. करिअरमध्ये बढती किंवा चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. मानसिक शांतता आणि समाधान मिळेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन रास (Pisces June 2026 Monthly Horoscope)

मीन राशीसाठी 17 ते 30 जूनचा काळ इच्छित कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल. आर्थिक लाभ आणि बचतीत वाढ होईल. आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. प्रेमजीवनात सकारात्मक बदल होतील. आरोग्य सामान्यतः चांगले राहील.

हेही वाचा

June 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो..जूनचे शेवटचे 15 दिवस नशीब पालटणारे! 4 राशींच्या हातात पैसा खेळेल, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *