Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : पहिले थर्ड अंपायर धावला, मग फिल्डरने जीवदान दिलं; पण वैभव सूर्यवंशीने शेवटी माती खाल्ली?, नेमकं काय घडलं?


Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा मालिकेत अफगाणिस्तान अ संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या नशिबाने त्याला साथ दिली. सामन्याच्या सुरुवातीलाच त्याचा डाव संपुष्टात येणार असे दिसत होते, मात्र नशिबाच्या बळावर त्याला दोन मोठे जीवदान मिळाले. या मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याने संघासाठी काही धावा नक्कीच जोडल्या, पण या वेळीही त्याला मोठ्या धावसंख्येचे रूपांतर करण्यात अपयश आले.

कसे मिळाले वैभवला दोन जीवदान?

पहिले जीवदान डावातील दुसऱ्याच षटकात वैभव सूर्यवंशीने एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो झेलबाद झाला. मैदानातील पंचांनी (ऑन-फील्ड अंपायर) त्याला बाद घोषित केले होते. मात्र, संशयास्पद झेल असल्यामुळे हे प्रकरण थर्ड अंपायरकडे गेले. रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की, चेंडू जमिनीला स्पर्श करून गेला होता. त्यामुळे थर्ड अंपायरने पंचांचा निर्णय फिरवत वैभवला नाबाद घोषित केले. विशेष म्हणजे, यावेळी वैभवचे खातेही उघडले नव्हते.
 
थर्ड अंपायरने वाचवल्यानंतर अवघ्या काही चेंडूंच्या अंतराने वैभवला पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाली. या वेळी त्याने चेंडू हवेत मारला, परंतु अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकाला फिल्डर तो झेल टिपता आला नाही. अशा प्रकारे काही मिनिटांतच त्याला दुसरे जीवदान मिळाले.

वैभवने किती धावा केल्या?

दोन वेळा जीवदान मिळाल्यानंतर वैभवने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने काही चौकार आणि षटकार ठोकत धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतकी चांगली सुरुवात आणि नशिबाची साथ मिळूनही तो मोठी खेळी करू शकला नाही. वैभव सूर्यवंशीने 27 चेंडूंचा सामना करत 38 धावा केल्या. या छोट्या पण वेगवान खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. तो वेगाने धावा करण्यात यशस्वी ठरला, तरीही त्याला अर्धशतकाचा टप्पा गाठता आला नाही.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *