Sonu Nigam: सोनू निगम देतोय गंभीर आजाराशी झुंज; घसा बसला अन्…कॉन्सर्टपूर्वी गायकानं VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं


Sonu Nigam Health Update: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) सध्या आपल्या गाण्यामुळे नसून, एका वेगळ्याच कारणामुळे (Singer Health) चर्चेत आला आहे. अलिकडेच  सोनू निगमने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यानं एका वेदनादायक आरोग्याशी झुंज (Entertainment) देत असल्याचं सांगितलं. त्रास होत असला तरी, गायक प्रोफेशनल कमिटमेंट विसरलेला नाही. सोनू निगमला नेमकं झालं तरी  काय?  त्याची प्रकृती आता कशी आहे? जाणून घेऊयात.

सोनू निगमला झालंय तरी काय? (Sonu Nigam Pinched Nerves)

अलिकडेच सोनू निगमने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.  मुंबईत होणाऱ्या लाईव्ह परफॉर्मेन्स पूर्वी त्यानं आपल्या प्रकृती विषयी अपडेट दिली आहे. सोनूनं सांगितलं की त्याला नसा दबल्याचा म्हणजेच  पिंच्ड नर्व्ह्सचा त्रास आहे.  गेल्या आठवडाभरापासून त्याच्यावर अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. हा त्रास नेमका होतोय का? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या वैद्यकीय चाचण्या सुरु होत्या.

सोनू निगमला नेमका त्रास काय? (Sonu Nigam Health Update)

या आजाराचे निदान झाल्यानंतर  सोनूला धक्का बसला. आपल्या प्रकृतीविषयी माहिती देताना सोनू निगम म्हणाला, ‘ माझी सध्या हालत खराब आहे. माझ्या नर्व्ह्स दबल्या गेल्या आहे.  एक आठवड्यापासून माझे  एमआरआय आणि सीटी स्कॅन सुरू आहे. फिजिओथेरेपी प्रचंड त्रासदायक होते. जास्त वेदना होऊ नये म्हणून मी पेन किलर्सच्या गोळ्या खात होतो’, असं सोनू निगम म्हणाला.

‘या त्रासामुळे माझा गळा थोडा दुखत आहे’, असं सिंगरने सांगितलं. वेदनेत असूनही त्यानं कोणतेही कॉन्सर्ट रद्द केले नाही. त्यानं आपले काम अविरत सुरू ठेवले. सोनू निगमने सांगितलं की, तो बऱ्याच काळानंतर स्टेज परफॉर्मन्स करत आहेत.  तसेच त्रास होत असला तरी,  स्टेज परफॉर्मन्स करणार,  असंही प्रसिद्ध गायकाने स्पष्ट केलं.  सोनू निगमनं सांगितलं की, नसांना रिलॅक्स करण्यासाठी देण्यात आलेल्या औषधांचा थेट परिणाम घशावर झाला. ‘एका गायकासाठी कार्यक्रमापूर्वी घसा दुखणे, ही चिंतेची बाब असू शकते’, असंही गायकाने सांगितलं. सोनू निगमचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, या व्हिडीओवर नेटकरी आणि चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘देऊळ बंद 2’ वर स्वामींची कृपा, सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला; मंगळवारी किती कमावले?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *