बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम सध्या गंभीर आणि वेदनादायी आरोग्य समस्येचा सामना करत आहे… सोनू निगम याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत, स्वतःच्या आरोग्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. सोनू निगम सध्या ‘पिंच्ड नर्व्ह’ म्हणजे नस दबण्याच्या समस्येचा सामना करत आहे. या आजारामुळे गायकाला प्रचंड वेदना होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीव्र वेदना असून देखील सोनू निगम याने मुंबई येखील लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे… ज्यामुळे चाहत्यांनी अधिक चिंता व्यक्त केली आहे.
सोनू निगम याने नुकताच सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे आपल्या आरोग्याविषयी माहिती दिली. या व्हिडिओमध्ये त्याच्या मानेवर काही पॅचेस लावलेलं दिसत आहेत. त्याला ‘पिंच्ड नर्व्ह’चा त्रास होत असून, त्यामुळे त्याला तीव्र वेदना होत असल्याचे त्याने सांगितलं.
व्हिडीओ पोस्ट करत गायक म्हणाला, ‘गेल्या एका आठवड्यापासून माझ्यावर उपचार सुरु आहेत. माझ्या माने जवळच्या नस दबल्या आहे… एका आठवड्यापासून त्रास सहन करत आहे… माझे MIR आणि सीटी स्कॅन होत आहेत आणि खूप साऱ्या गोळ्या घेत आहे…’ असं सोनू निगम याने स्वतः सांगितलं आहे.
नसांवर दबाव पडल्यामुळे तीव्र वेदना होत आहेत… असं देखील गायक म्हणाला. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत. व्हिडिओमध्ये सोनूने त्याच्या फिजिओथेरपीबद्दल देखील सांगितलं आहे. उपचारादरम्यान फिजिओथेरपीची सत्रे खूप वेदनादायी होती, असं त्याने सांगितलं. वेदनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला पेन किलरचा आधार घ्यावा लागला.
लाईव्ह कॉन्सर्ट नाही करणार रद्द – सोनू निगम
वेदना होत असल्यातरी सोनू निगम याने स्पष्ट केलं आहे की, काहीही झालं तरी कॉन्सर्ट रद्द करणार नाही. हा कॉन्सर्ट मुंबईत होणार आहे… मला माझ्या चाहत्यांना नाराज करायचं नाही… इतक्या अडचणी असूनही, मी माझा कॉन्सर्ट रद्द करणार नाही. मला मंचावर जावंच लागेल; परमेश्वर मला बळ देवो.’ गायकाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.