एकनाथ शिंदेंनी दिल्लीपूर्वी मध्यरात्री गाठले राजस्थान, जयपूरमध्ये देशातील बड्या व्यक्तीला भेटले, काय ठरलं? – Marathi News | Eknath Shinde is in Delhi and has submitted a letter to the Lok Sabha Speaker regarding separate faction of 6 Thackeray camp MP


राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे खासदार लवकरच बंड करणार असल्याचे दिसतंय. तशा घडामोडी घडताना देखील दिसत आहेत. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. संजय राऊत यांनीही याबाबतची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. खासदार लवकरच बंड करणार असून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सक्रिय झाल्याचे दिसतंय. एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीकडून मध्यरात्री राजस्थानकडे रवाना झाले. ठाकरे गटाचे खासदार दिल्लीत आहेत. मात्र, ते शिंदेंच्या संपर्कात आहेत. खास विमाने या खासदारांना दिल्लीत नेण्याकरिता पाठवण्यात आली होती. राजस्थानमध्ये एकनाथ शिंदे यांनी बड्या नेत्याची भेट घेतली. संभाव्य फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण पाच खासदार अनुपस्थित होते.

राज्यात शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सक्रिय झाल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री दिल्लीला रवाना झाले, त्यानंतर त्यांनी काल रात्री थेट राजस्थानमध्ये जाऊन ओम बिर्ला यांची भेट घेतली.  श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ठाकरे यांचे खासदार आणि एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही भेट झाल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांचे खासदार लोकसभा अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचीही मोठी माहिती पुढे येतंय. ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची प्राथमिक माहिती माहिती मिळत आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का म्हणावा लागेल. त्यांचे खासदार थेट वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना देखील अलर्टवर आली होती.

शिवसेनेच्या वर्धापन दिन आधी उद्धव ठाकरेंची साथ सोडून सहा खासदार एकनाथ शिंदे सोबत शामिल होणार असल्याची मोठी माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी ओम बिर्ला यांची भेट राजस्थानमध्ये घेत वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले असल्याची माहितीही मिळत आहे. शिंदे यांनी काल राजस्थान जाऊन मग दिल्ली गाठले. ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *