केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार


Maharashtra Police Force News : महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमार्फत 60 टक्के निधी केंद्र तर 40 टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.  सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहिम, सायबर सुरक्षा, आधुनिक शस्त्रे, वाहने सुसज्ज करण्यास मदत होणार आहे. 

 केंद्र सरकारकडून 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत केंद्र सरकारचे आभार मानलेत. या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल. महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अतिशय मनापासून आभारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे.

पोलिसांकडे केवळ मनुष्यबळ असून चालणार नाही, तर तांत्रिक बळ असणेही तितकेच गरजेचे

सध्याच्या काळात नेहमीच्या गुन्हेगारीसोबतच डिजिटल आणि संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी पोलिसांकडे केवळ मनुष्यबळ असून चालणार नाही, तर तांत्रिक बळ असणेही तितकेच गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वात सुसज्ज, कार्यक्षम आणि हायटेक दलांपैकी एक बनेल, असा विश्वास प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

सायबर सुरक्षा आणि एआय (AI)

सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर व सायबर सेलचे सक्षमीकरणासाठी  या निधीचा वापर केला  जाणार आहे. 

सागरी सुरक्षा

राज्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा आणि संसाधनांची उभारणीसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. 

आधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहने

पोलिस दलाला अत्याधुनिक शस्त्रे आणि घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी नवीन वेगवान वाहने पुरवणेयासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.

नागरिक सुरक्षा

महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना करण्यासंदर्भात या निधीचा वापर केला  जाणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *