भारतीय महिला क्रिकेट संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वामध्ये आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. भारताने रविवारी 15 जून रोजी पाकिस्तानचा धुव्वा उडवत या स्पर्धेतील आपला पहिलाच सामना जिंकला. त्यामुळे आता टीम इंडियाचा सलग दुसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियासमोर दुसऱ्या सामन्यात नेदरँड्सचं आव्हान असणार आहे. हा सामना लीड्समधील ऐतिहासिक हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.