नवरा-बायको असूनही त्यांच्यात…; भाग्यश्रीने रितेश-जिनिलियाच्या नात्यावर केला मोठा खुलासा! – Marathi News | Bhagyashree Reveals the Secret Behind Riteish and Genelias Strong Bond Even as Husband and Wife


महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा ‘राजा शिवाजी’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूडची तगडी स्टार कास्ट दिसली. अभिनेता रितेश देशमुखने चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. तसेच चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. तर रितेशची पत्नी जिनिलियाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री भाग्यश्रीने आता रितेश आणि जिनिलियाबाबत मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाली भाग्यश्री?

भाग्यश्रीने नुकताच व्हरायटी इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये भाग्यश्रीने तिने रितेश आणि जिनिलियाचे भरभरुन कौतुक केले आहे. तसेच सेटवर त्या दोघांचे नाते कसे होते हे देखील सांगितले आहे. “जिनिलियाने चित्रपटाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य ते समतोल साधला होता. तर दुसरीकडे रितेशने सर्वस्व पणाला लावले होते. कारण हा सिनेमा त्याचे खूप मोठे आणि जुने स्वप्न होते” असे भाग्यश्री म्हणाली.

पुढे रितेश आणि जिनिलियाविषयी बोलताना भाग्यश्री म्हणाली की, “रितेश आणि जिनिलिया नवरा बायको म्हणून काम करत असताना दोघांमध्ये सेटवर खरी मैत्री पाहायला मिळाली. खऱ्या आयुष्यात नवरा-बायको असूनही सेटवर मैत्री टिकवणे हे कठीण असते. दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यामध्ये वैचारिक मतभेद अनेकदा होण्याची शक्यता असते. पण दोघांनीही ते बाजूला ठेवून अत्यंत सहजतेने काम पूर्ण केले.”

शेवटी भाग्यश्रीने रितेश आणि जिनिलिया पुढच्या पिढीसाठी एक चांगला आदर्श असल्याचे म्हटले जाते. तिने सांगितले की, रितेश आणि जिनिलिया एकमेकांच्या कामाचा आदर करतात. वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यगी तितक्याच ताकदीने सांभाळायला हवे. आजच्या काळातील जोडप्यांसाठी हा एक उत्तम आदर्श आहे.

राजा शिवाजी सिनेमाविषयी

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जिनिलिया देशमुख हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *