Manoj Jarnage: तुकाराम मुंढेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय; जरांगे पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय


कोल्हापूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. या आंदोलनास मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन समर्थन केलं. त्यानंतर, आज शाहूनगरी कोल्हापुरात जरांगे पाटील पोहोचले असून मराठा आरक्षण आणि कोल्हापूर, सातारा गॅझेटसंदर्भात त्यांनी मागणी केली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत त्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असे त्यांनी म्हटलं. तर, सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) धडाकेबाज कारवाईचंही त्यांनी कौतुक केलं. तसेच, तुकाराम मुंढेंची बदली (Transfer) करू नका, अशी मागणी देखील त्यांनी शासनाकडे केलीय.

धडाकेबाज आयएएस आणि आपल्या सततच्या बदल्यांमुळे प्रशासनातही वचक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंची महिनाभरापूर्वीच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने राज्यभरात त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट दिसत आहे. महिनाभरात त्यांनी केलेल्या धडक कारवाईने, अवैध गुटखाविक्रेते, भेसळवाले, हॉटेलवाले आणि मेडिकवाल्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दूधातील भेसळवरुनही राज्यभरात शेतकऱ्यांकडून तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं स्वागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, आता सरकारने तुकाराम मुंढेंची बदली करू नये, अशी मागणी शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. तर, मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला इशारा दिला आहे. कोल्हापूरातूनही त्यांनी आज ही मागणी बोलून दाखवली. 

आता, तुकाराम मुंढे साहेबांनी कामाचा चांगलाच दणका दिला आहे, आता दुधाचे भाव वाढत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगितलं की, तुकाराम मुंढे यांची बदली करू नये, असे म्हणत तुकाराम मुंढेंची बदली न करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा बोलून दाखवली. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनात मी जाणारच

शेतकऱ्यांसाठी कुठंही कुणाचंही आंदोलन असो मी जाणार, ते आंदोलन भाजप करू, राष्ट्रवादी करू किंवा शिवसेना करू दे, मी जाणारच, असे म्हणत शेतकऱ्याना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. उगाच 2 लाख दिले आहे, 1500 दिले असं नको, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं. सरकारने, लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले आणि कर्जाचा बोजा तसाच ठेवला, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. 

हेही वाचा

आता, आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावं लागेल; मंत्री शंभूराज देसाईंचा इशारा, विधानपरिषदेवरुन नाराजी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *