Amol Kolhe On MI Savitribai Jyotirao Phule Serial Offair Reasons: ‘आपल्या भावना कॉर्पोरेटला समजत नाही ‘; अमोल कोल्हेंनी सांगितली ‘मी सावित्रीबाई .. ‘ मालिका बंद करण्याची कारणं;  TRP, आर्थिक अडचण सगळंच सांगून टाकलं


Mi Savitribai Jyotirao Phule serial Off-air Reasons:  गेल्या काही दिवसांपासून ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ (Mi Savitribai Jyotirao Phule)मालिका टीआरपीचं कारण देत बंद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मालिका वाचवण्याचा अनेक प्रयत्न केले. मालिका कशाप्रकारे बंद पडली जाते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. अमोल कोल्हे यांच्या भाषणानंतर आमदार रोहित पवार यांनी मालिकेसाठी 50 लाख रुपये तर जितेंद्र आव्हाड यांनी 10 लाख रुपये मदत जाहीर केली होती. ही मालिका बंद करू नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, वाहिनीने व्यावसायिक कारण देत मालिका सुरू ठेवण्याचा पुनर्विचार टाळला. ही मालिका नेमकी कशामुळे बंद करण्यात आली ? याची कारणमीमांसा करणारा एक व्हिडिओ नुकताच डॉ अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. 

काय म्हणाले डॉ अमोल कोल्हे?

“जय शिवराय. मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ही स्टार प्रवाहवरील मालिका 14 जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतेय. शेवटचा भाग आज प्रसारित होणार आहे. ही मालिका बंद होण्याची कारणे काय आहेत? TRP हे  प्रमुख कारण आहे की आणखी काही.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढे काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. पाच जानेवारीला स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु झाली होती ती 14 जूनला संपणार आहे.  जेंव्हापासून ही बातमी बाहेर आली की, मालिका बंद होतेय, तेंव्हापासून असंख्य  फोन आले, मेसेजेस , email  द्वारे  लोकांनी  ही मालिका बंद होऊ नये, हा इतिहास लोकांपार्यात पोहोचला पाहिजे यासाठी विनवण्या केल्या. परवा पंढरपुरात एका युवकानं भर उन्हात राहून ही मालिका सुरु राहावी यासाठी आंदोलन केलं. एवढच नाही तर मालिका सुरु राहावी यासाठी इंदापुरातील  निमगाव केतकी गावात गावकऱ्यांनी बैठक घेतली. बार्शी तालुक्यातील गावांमध्येही अनेक ठिकाणी मालिका सुरु राहावी यासाठी प्रयत्न झाले. आजच्या काळातही महात्मा फुले समजून घेणं, पचणे, रुचणे हे अवघड गोष्ट आहे. व्यवस्थेविरोधात बंड करणारे होते. सामाजिक क्रांतिकारक आहेत.  हा विरोध त्यांना त्या काळातही होता. म्हणून तर सावित्रीबाईंना शाळा सुरु  करताना शिणगारा सोसावा लागला. ” असं अमोल कोल्हे म्हणाले.

 

कोणावरही आकस नाही : अमोल कोल्हे

सर्वप्रथम मी स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी  ही मालिका करण्याची संधी दिली. आजच्या सासू सुनांच्या  मालिकांचा  बोलबाला असताना स्टार प्रवाहने सतीश राजवाडे, EP अभिजित खाडे, कौस्तुभ बेडेकर  यांचे मनापासून आभार मानतो. कारण 152 भाग का होईना ही गोष्ट सांगण्याचं धाडस  त्यांनी दाखवलं. वेळोवेळी त्यांनी पूर्ण सहकार्य दाखवलं. माझा  कोणावरही आकस नाही, रोषसुद्धा नाही, कारण ही मालिका सांगण्याचं एक  प्रामाणिक प्रयत्न  स्टार प्रवाहने केला हे मी नमूद करू इच्छितो.आपल्या सगळ्यांची जी भावना आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत. कॉर्पोरेट  कल्चरला या भावना कळू शकत नाहीत अशी माझी धारणा आहे.  ही मालिका सादर करणारे जे सर्व सहकलाकार आहेत. या सगळ्यांनी मनापासून मेहनत केली. सगळ्यांचे मी आभार मानतो. जगदंब क्रिएशनची सगळी टीम ही घरचीच आहे. 

मालिका बंद होण्याची करणे काय?

” स्टार  प्रवाहने मला जे कारण दिलं ते असं आहे की , मालिकेला मिळणारा TRP आणि मालिकेला लागणारा पैसा याची सांगड  जुळत नाही  असं कॉर्पोरेटचं मत आहे. आता ही सांगड जुळत नाही, याबाबत अनेक प्रश्न अनेकांना पडू शकतात. म्हणजे याचं ऐतिहासिक मूल्य जे आहे, याची नोंद घेतलीय का? याची डबिंगची बाब लक्षात घेतलीय का.. तसेच अनेक बाबी असतात. सामाजिक बांधिलकी असते.  या अनेक गोष्टींच्या खोलात गेलं तर  आणखी गोष्टींचा गुंता  वाढत जातो. ही मालिका वाहिनीची होती. गोष्ट महाराष्ट्राची असली तरी मालिका वाहिनीच्या मालकीची असते. त्यांनी  व्यावसायिक  गणिते हा  निकष आधी लावला असेल ज्यामुळे ही मालिका बंद होतेय.” असंही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

आर्थिक अडचणीचा विषय

डॉ अमोल कोल्हे म्हणाले, “पुढचा प्रश आर्थिक  अडचण. यासाठी आधी मी आमदार रोहित पवार यांचे मनापासून आभार मानेन. आमदार जितेंद्र आव्हाड, आदरणीय छगन भुजबळ  याचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांना हा सगळं प्रकार कळल्यानंतर त्यांनी घसघशित आर्थिक मदत जाहीर केली. स्टार प्रवाहवरील ही मालिका संपणार असली तरी गोष्ट थांबणार नाही. हे फार मोठं शिवधनुष्य आहे.  तुम्हा सर्वांच्या साथीने हे उचलायचंय. जगदंब क्रिएशनच्या संपूर्ण टीमने ठरवलं आहे. या साग्लुयातून आपण पुढे जाणार आहोत. लवकरच सगळे अपडेट तुम्हाला मिळतील.  मालिका कधी, कुठे किती वाजता सुरु होईल याबाबत मंगळवारी माहिती देईन’ असं डॉ अमोल कोल्हे म्हणाले.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *