Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट


US Iran Peace Deal  नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे.  दोन्ही देशांमध्ये बराच काळ प्रलंबित असलेल्या शांतता करारावर सहमती झाली आहे. या डीलची घोषणा करताना ट्रम्प यांनी  होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री खुली केली जाईल आणि अमेरिकन नौदलानं केलेली नाकाबंदी देखील मागं घेतली जाईल असं जाहीर केलं. यामुळं क्रूड ऑईलचे दर गडगडले आहेत.

कच्चा तेलाचे दर गडगडले 

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार असल्याची अपडेट येताच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचे दर क्रॅश झाले. ब्रेंट क्रूड फ्यूचर्समध्ये 4 टक्क्यांची घट झाली. तर, US वेस्ट टेक्सास इंटरमीजिएटमध्ये 4.60 टक्क्यांची घसरण झाली. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे संकेत मिळताच कच्चा तेलाच्या दरात घसरण दिसून येत होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करारावर सहमती झाल्याची घोषणा करताच कच्चा तेलाचे दर आणखी घसरले. ब्रेंट क्रूड चा दर 4 टक्क्यांनी घसरले आणि 83 डॉलर प्रति बॅरलवर आले. दुसरीकडे WTI Crude चा दर 80 डॉलर प्रति बॅरलवर आला.   Murban Crude चा दर देखील 83 डॉलर वर पोहोचला. 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत डील पूर्ण झाली आहे. सर्वांचं अभिनंदन. मी या माध्यमातून घोषणा करतो की होर्मुझची सामुद्रधुनी देखील टोल फ्री सुरु होईल आणि अमेरिकन नौदलाला देखील नाकाबंदी हटवण्यास मंजुरी देतोय, असं ट्रम्प म्हणाले.  होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधनाचा पुरवठा ज्या देशांना होतो त्या जगभरातील जहाजांनी त्यांची इंजिन सुरु करावी आणि तेलाचा पुरवठा सुरु होऊद्यात असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शांतता कराराच्या घोषणेला इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलनं दुजोरा दिला आहे.

19 जूनला करारावर स्वाक्षरी

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी देखील एक्सवर पोस्ट करत  अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला दुजोरा दिला आहे. शहबाझ शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्या शांतता करारावर सहमती झाल्याचं म्हटलं. अमेरिका आणि इराण यांचे शिष्टमंडळ 19 जनला स्वित्झरलँडमध्ये भेटेल आणि तिथं करारावर स्वाक्षरी होईल,असंही शहबाझ शरीफ यांनी जाहीर केलं.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *