IND vs PAK Toss : टीम इंडियाची बर्मिंगहॅममध्ये बॅटिंग, पाकिस्तान विरुद्ध किती धावा करणार? – Marathi News | Ind vs pak icc womens t20i world cup 2026 india won toss against pakistan and elected batting see playing 11


आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20I World Cup 2026) सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत.

या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हीने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय फलंदाज पाकिस्तानसमोर किती धावा करण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टी 20i मधील दोन्ही संघांची कामगिरी

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 16 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 16 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने 3 सामन्यांमध्ये पलटवार केला आहे. मात्र आकडेवारी पाहता पाकिस्तान टीम इंडियासमोर कमजोर असल्याचं स्पष्ट होतं.

भारताची 2026 मधील आकडेवारी चिंताजनक

वुमन्स टीम इंडियाला 2026 या वर्षात आतापर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी
कामगिरी करता आलेली नाही. भारताने या वर्षात एकूण 11 सामने खेळले आहेत. भारताला त्यापैकी फक्त 4 सामनेच जिंकता आले आहेत. तर महिला ब्रिगेडला 7 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे.

वुमन्स टीम इंडियाची एजबेस्टन स्टेडियममधील कामगिरी

वुमन्स टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये एकूण 6 टी 20I सामने खेळले आहेत. भारताची या स्टेडियममधील कामगिरी 50-50 अशी राहिली आहे. भारताने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यांमध्ये महिला संघाला पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे महिला ब्रिगेड या मैदानात चौथा सामना जिंकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एजबेस्टन स्टेडियममधील आकडे काय सांगतात?

एजबेस्टन स्टेडियममध्ये 2025 पासून 16 पैकी 10 सामन्यांमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तर 6 सामन्यांत विजयी धावांचा पाठलाग करणारा संघ यशस्वी ठरला आहे. त्यामुळे 17 व्या सामन्याचा काय निकाल लागतो याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी आणि क्रांती गौड.

पाकिस्तान वुमन्स टीम प्लेइंग इलेव्हन : गुल फिरोजा, मुनीबा अली (विकेटकीपर), आयशा जफर, सायरा जबीन, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, फातिमा सना (कर्णधार), रमीन शमीम, नशरा संधू, तस्मिया रुबाब आणि सादिया इक्बाल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *