वाशिम जिल्हा हादरला, गेल्या 27 तासात वेगवेगळ्या घटनांमध्ये 8 जणांचा अकाली मृत्यू


Washim News : वाशिम जिल्ह्यात 27 तासात 4 वेगवेगळ्या घटनांमध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये काल तीन घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू समोर आला असून, आज पुन्हा एका घटनेत दोन जणांचा नदीच्या पाण्यात  बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

काल सकाळी फुलउंबरी येथील प्रकल्पात एका 18 वर्षीय युवकाचा प्रकल्पात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर दुपारच्या सुमारास कुपटी येथील एका युवकाने प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केली. तर या घटनेच्या काही वेळानंतर मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील बकाल या एकाच कुटुंबातील पत्नी सह 2 मुलांना हातपाय बांधून विहिरीत फेकत स्वतः पतीने वीज वितरण कँपणीच्या टॉवरला गळफास घेत आत्महत्या केली. एकूण एकाच कुटुंबातील  चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आज पुन्हा दोन जणांचा नदीच्या पाण्यात  बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

आज सकाळी इंझोरी येथील दोन युवक पोहण्यासाठी अडान नदीवर गेले असता त्या दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाने. या घटनामुळं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. आजच्या घटनेने, दोन्ही कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला असल्याने धोंड्याच्या महिन्याच्या सरत्या शेवटच्या 27 तासात 8 जणांचा अकाली मृत्यू हा चर्चेचा विषय ठरला आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *