Himanshu Jangra on Pranit More Show 370 Biryani Statement: गेल्या काही दिवसांपासून प्रणित मोरेच्या शोमधील हिमांशू जांगडा प्रचंड चर्चेत आहे. डेटवर घेऊन गेलेल्या महिलेला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली, नंतर घरी सोड म्हटल्यानंतर, ‘370 रु वसूल तर करावे लागतील ‘ असं म्हणत महलेशी शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगणाऱ्या या तरुणाच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उडाला होता. महिलांविषयी असंवेदनशील आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हिमांशूला हे वक्तव्य व्हायरल झाल्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. शिवाय, अनेक कायदेशीर नोटीसा आल्या.त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला कॉमेडियन प्रणित मोरेसह बोलवल्यानंतर आता हिमांशू जांगडाने सगळ्या प्रकारावर मौन सोडलं आहे.
काय म्हणाला हिमांशू जांगडा ?
गुरुग्राममधील स्टारविक डिझाईन म्हणजे, ज्या कंपनीतून त्याला काढून टाकलं, त्यांच्या अकाउंटवर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये तो म्हणाला ‘ सर आता माझी अवस्था खूप वाईट आहे. मी खूप तणावत आहे. आता जेव्हा मी माझ्या कुटुंबाला पाहतो, तेव्हा मला खूप पश्चाताप होतोय की, मी त्या शोमध्ये का गेलो.’ ज्यांनी नोकरीवरून काढून टाकलं त्यांच्याशी बोलताना हिमांशूने नेमका काय प्रकार झाला हे सांगितले.
तो म्हणाला ‘ तुम्हाला माहीतच आहे की गेल्या दोन आठवड्यांपासून मला माझ्या instagram वर प्रचंड ट्रॉलिंगला सामोरे जावे लागत आहे. एक आठवड्यापर्यंत याबद्दल कोणालाच माहीत नव्हते.घरीही कोणाला याची कल्पना नव्हती,माझ्या मूळ गावीही कोणालाच याबद्दल माहीत नव्हते.पण गेल्या रविवारी माझ्या काकांना याबद्दल कळले. व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहून त्याच्या काकांनी त्याला फोन करून हे काय चाललंय याचा स्पष्टीकरण मागितलं होतं.
हिमांशू म्हणाला’ माझ्या काकांनी मला फोन करून विचारले की काय चालले आहे.मी त्यांना सर्व समजावून सांगितले. त्यांनी विचारले की ‘तू या शोमध्ये का गेला होतास . ते मला ओरडले’ पण पुढच्या दोन दिवसात मला यासाठी इतका द्वेष सहन करावा लागेल, असे मला अजिबात वाटले नव्हते. हा व्हिडिओ माझ्या नातेवाईकांकडे गेला. तो शेजाऱ्यांकडेही गेला.’हिमांशूने दिलेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांनी त्याच्या घरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्या वक्तव्याबद्दल विचारणा केली होती.
शेजारच्यांनी कुटुंबाकडे केली चौकशी
‘शेजारचे माझ्या घरी आले आणि त्यांनी माझ्या आई-वडिलांना सांगितले की, त्यांचा मुलगा या व्हिडिओमध्ये आहे .आणि ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे .त्यानंतर माझ्या कुटुंबाला याबद्दल कळले.असेही हिमांशू म्हणाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घरी बोलवून जाब विचारला.पण नोकरी गेल्यानंतर त्याच्यावरील दबाव आणखी वाढला. इथपर्यंत सर्व ठीक होते.पण जेव्हा त्यांना कळले की मला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे, त्यावेळी तेही खूप तणावात आले. आता माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मला नोटीससुद्धा मिळाली आहे. ‘ असंही हिमांशूने सांगितलं.
माझं वक्तव्य पूर्णपणे खरं नव्हतं ..
‘खरंतर,मी या शोचा मूळ भाग या आधीही पाहिला होता.त्यामुळे गुडगावमध्ये हे पहिल्यांदाच घडत होते.हे बहुतेक करून मुंबईतच केलं जातं.मी विचार केला की, एकदा जाऊन बघूया कसं आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या कॉमेडी शोला गेलो होतो. मी ज्या मुलीबद्दल बोलत आहे, अशाच एका मुलीला मी डेट केले होते.आमचं चांगलं बोलणं झालं आणि आम्ही बऱ्याच वेळ एकत्र घालवला.पण मी तिथे जे बोललो ते पूर्णपणे खरं नव्हतं.मी ऐनवेळी बोललो. ते केवळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने बोललो.मी मान्य करतो की मी तिथे काही चुकीचे शब्द वापरले.मला यासाठी माफी मागायची आहे. ‘असे हिमांशू जांगडा म्हणाला.
‘मी तिथे जे काही बोललो ते केवळ मनोरंजन करण्याचे उद्देशाने बोललो .माझा तसा कोणताही हेतू नाही,माझी तशी मानसिकता नाही.सर तुम्हाला माहित आहे की, मी तुमच्यासोबत काम केलं आहे,आमच्या ऑफिसमध्ये अनेक महिला सहकारी आहेत आणि आजपर्यंत त्यांची माझ्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.त्या शोमध्ये जे काही घडलं,तिथलं वातावरणच असं होतं की लोक त्याकडे मनोरंजकपणे पाहत होते.
प्रणित मोरेने मला प्रोत्साहित केलं..
सूत्रसंचालक प्रणित मोरेही ते मनोरंजकपणे घेत होता.त्या सगळ्यांचा आत्मविश्वास पाहून मला प्रोत्साहन मिळालं आणि मी त्यात आणखी थोडी भर घातली, असं तो म्हणाला.जेव्हा विरोध वाढत गेला, तेव्हा त्याने माफी मागितली आणि अखेरीस आपले सोशल मीडिया खाते बंद करून टाकलं. ‘ असंही हिमांशुने सांगितलं .
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष