पुण्यात भयानक घटना! नव्या गाडीचे पेढे खाल्ले अन् एकाच वेळी 7 जणांसोबत धक्कादायक घडलं; थेट तुकाराम मुंढेंना कळवलं | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

पुण्याच्या वडगाव शेरी परिसरात नवीन मोटार घेतल्याच्या आनंदात खाल्लेल्या पेढ्यांतून तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पेढ्यांतून तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा
पेढ्यांतून तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा

पुणे : घरामध्ये नवीन गाडी आल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, आनंदाच्या भरात सगळ्यांना पेढे वाटण्यात आले…पण याच पेढ्यांनी एका क्षणात आनंदाचे रूपांतर भयंकर घटनेत होईल, असा विचारही कोणी केला नव्हता. पुण्याच्या वडगाव शेरी परिसरात नवीन मोटार घेतल्याच्या आनंदात खाल्लेल्या पेढ्यांतून तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असून, या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी थेट राज्याचे डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांना तक्रार केल्याने अन्न व औषध प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वडगाव शेरी येथील ‘गुडविल वृंदावन सोसायटी’मध्ये घडली. नवीन मोटार गाडी खरेदी केल्यानंतर स्थानिक मिठाईच्या दुकानातून पेढे विकत आणले गेले होते. घरातील आणि ओळखीच्या ७ जणांनी हे पेढे खाल्ले. मात्र, पेढे खाल्ल्यानंतर अवघ्या काही वेळातच सर्वांना तीव्र उलट्या आणि त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती इतकी खालावली की सर्वांना तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयांत धाव घ्यावी लागली.

आरुष अजित नवसरे (वय १४) या चिमुरड्याला गंभीर विषबाधा झाली असून, त्याच्यावर सध्या एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या घटनेतील आणखी एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगर रस्त्यावरील प्रसिद्ध ‘सह्याद्री रुग्णालयात’ दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना कोरेगाव पार्क येथील ‘बुधराणी रुग्णालयात’ अतिदक्षतेखाली उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अॅड. अश्विनी शेवाळे यांनी थेट तुकाराम मुंढेंना कळवलं

विषबाधा झालेल्या आरुषच्या नातेवाईक अॅड. अश्विनी शेवाळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची भीषणता पाहून थेट अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) मुख्य आयुक्त, डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पुण्यात घडलेल्या या भयंकर प्रकाराची माहिती दिली.

‘FDA’ अधिकारी ॲक्शन मोडमध्ये

आयुक्तांचा आदेश सुटताच ‘एफडीए’चे पुणे विभागाचे अधिकारी तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने संबंधित रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर ज्या स्थानिक मिठाईच्या दुकानातून हे पेढे खरेदी केले होते, तिथे छापा टाकून तपासासाठी पेढ्यांचे नमुने जप्त केले आहेत. हे पेढे नेमके कशामुळे विषारी बनले? त्यात कोणती रासायनिक भेसळ होती का? याचे गूढ आता प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/

पुण्यात भयानक घटना! नव्या गाडीचे पेढे खाल्ले अन् एकाच वेळी 7 जणांसोबत धक्कादायक घडलं; थेट तुकाराम मुंढेंना कळवलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *