Nilesh Lanke : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कालपासून (12 जून) पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान, आम्हीही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीमधील जाचकाठी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. दरम्यान, रस्त्यावर उतरा मंत्र्यांना फिरू देऊ नका, आता मंत्रालयातच जनावरे घेऊन जाऊ आंदोलन करणाऱ्यांवर टीका करताना लाजा वाटत नाहीत का? असे म्हणत खासदार निलेश लंके यांनी फडणवीस सरकारवर आसूड ओढला.
अन्नत्याग आंदोलनाला दोन दिवस
अन्नत्याग आंदोलनाला दोन दिवस झाले तरी सरकारला जाग येत नसेल तर आता रस्त्यावर उतरा, मंत्र्यांना फिरू देऊ नका, तहसील कार्यालयात शेळ्या मेंढ्या आणि बकरी घेऊन घुसा मी तर म्हणतो आता मंत्रालयातच जाऊन आपली जनावरे सोडू त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही असा आसूड अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी फडणवीस सरकार वर ओढला. रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळी खासदार निलेश लंके आणि खासदार भगरे यांनी भेट दिल्यावर त्यांच्या खांद्यावर आसूड देण्यात आला होता. याचाच संदर्भ घेत हातात आसूड घेऊन शेतकऱ्यांना निलेश लंके यांनी आवाहन केले. रोहित पवार यांच्यावर स्टंटबाजीचा आरोप करणाऱ्यांना सडकून काढत तुम्ही एक तास तरी उपाशी राहून दाखवा. तुम्हाला लाजा तरी वाटल्या पाहिजेत असं बोलायला अशा शब्दात सत्ताधारी नेत्यांवर लंकेंनी टीका केली.
तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे जावा मंत्र्यांकडे जावा आणि आजच्या आज निर्णय घ्या
कोणीतरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे येते म्हणून तुम्ही टीका करता. पण तुमचे बाप जादेही शेतकरी होते याची थोडी तरी जाणीव ठेवा आणि ठीक आहे जर रोहित दादा स्टंट करीत असतील तर तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांकडे जावा मंत्र्यांकडे जावा आणि आजच्या आज निर्णय घ्या रोहित दादा लगेच अन्न त्याग आंदोलन मागे घेतील अशी सडकून टीकाही खासदार लंके यांनी केली. रोहित पवार दोन दिवसांपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या