Divyanka Tripathi: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या आयुष्यात डबल आनंद, जुळ्या मुलांना दिला जन्म; बाळांची पहिली झलक शेअर, म्हणाली…


Divyanka Tripathi and Vivek Dahiya: टीव्ही अॅक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठीचा (Divyanka Tripathi) चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिनं मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं.  अभिनेत्री सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला. दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया (Vivek Dahiya) हे दोन मुलांचे आई – वडील झाले आहेत. मे महिन्यात मुलांना जन्म दिल्यानंतर, दिव्यांकाने आज सोशल मीडियावर (Entertainment) त्यांची पहिली झलक शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने पोस्ट शेअर करुन आपल्या मुलांची पहिली झलक दाखवली आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

दिव्यांका अन् विवेकनं जुळ्या मुलांची पहिली झलक केली शेअर (Divyanka Tripathi shares first glimpse of Twin Baby Boys)

दिव्यांका आणि विवेक यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिव्यांकाने जुळ्या मुलांना जन्म दिला. तिनं अलिकडेच आपल्या पोस्टमधून जुळ्या मुलांची झलक दाखवली. परंतु, अभिनेत्रीनं अद्याप मुलांचा चेहरा दाखवला नाही. तिनं आपल्या पोस्टमधून, ‘मला निवडण्याबद्दल धन्यवाद’, असं म्हटलं आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.    

दिव्यांका आणि विवेकने इन्स्टाग्रामवर एक जॉइंट पोस्ट शेअर केली आहे. तसेच ट्विन्स बॉईजबद्दल माहिती दिली.  ‘आम्ही देवाकडे एका आनंदाची मागणी केली होती, पण देवाने आम्हाला दुप्पट दिले. आम्हाला जुळे मुले झाली आहेत’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

विवेक दहियाने आपल्या पोस्टमध्ये, ‘आमची दीर्घ प्रतिक्षा आता संपली आहे.  आमच्या जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. आयुष्य पूर्वीपेक्षा  अधिक सुंदर झाले आहे. माझे करण अर्जून आले आहेत, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हवे आहे’, असं म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  दिव्यांका आणि विवेक यांनी मार्च महिन्यात चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत काही फोटो शेअर  केले होते. अभिनेत्रीने आपल्या डोहाळे जेवणाचे फोटोही शेअर केले होते. चाहत्यांकडून कायम अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव झाला आहे. 

‘ये है मोहब्बतें’च्या सेटवर लव्ह स्टोरीला सुरुवात (Divyanka Tripathi and Vivek Dahiya Love Story)

‘ये है मोहब्बतें’च्या  सेटवर दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांची भेट झाली होती.  दोघांनीही 2016 झाली भोपाळमध्ये लग्न केले होते.  दिव्यांकाने आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तिनं आपल्या कारकि‍र्दीत, ‘बनू में तेरी दुल्हन’ आणि ‘ये है मोहब्बतें’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.  तिनं या मालिकांमधून घराघरात ओळख निर्माण केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

“370 रुपयांची बिर्याणी” पडली महागात, प्रणित मोरेची एकूण संपत्ती किती? एका शोमधून किती कमावतो?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *