Ambadas Danve on Operation Tiger: लोकसभेची निवडणूक होऊन दोन वर्ष झाले आहेत. या दोन वर्षात अशी चर्चा आहे. शिवाय महिन्याला, दर दोन महिन्याला अशी चर्चा होतच असते. काही खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असतील, तर काही तर उघड उघड बोलत आहेत. आम्हालाही सर्व माहित आहे. मात्र दर महिना दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होते आता हे अधिकृत कबूल करायला हवं, असं मोठं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केलं आहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) हे मराठवाडा दौऱ्यावर असताना काही खासदार शिंदे यांच्या संपर्कात असतील या चर्चेला दुजोरा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपासून दोन वर्षात कायम खासदार शिंदेंच्या (Shiv Sena) संपर्कात असल्याची चर्चा होते. ठाकरे शिवसेनेचे (Shiv Sena UBT) सात खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार?, असा प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे. धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना अंबादास दानवे यांच्या आढावा बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकरही (Omraje Nimbalkar) गैरहजर राहिल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.(Ambadas Danve on Operation Tiger)
Ambadas Danve on Omraje Nimbalkar: आढावा बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते. मात्र ओमराजे निंबाळकर अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारली. ओमराजे निंबाळकर बैठकीला गैरहजर का? असा प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनी उत्तर देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
अंबादास दानवे यावेळी म्हणाले कि, काही काम असेल म्हणून ते आले नसतील, त्यांच्याच कार्यालयात बैठक होती असं म्हणत दानवेंनी यावर भाष्य केलं. मात्र एकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा होत असताना या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित चर्चेचं कारण ठरली आहे. एकीकडे ठाकरे गटाचे 7 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा असताना दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क– वितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’!