Nagpur: राज्यातील सर्वात जास्त लांबीच्या नागपुरातील उड्डाणपूलाचे आज उद्घाटन, नितीन गडकरींसह मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, उड्डाणपुलाला डॉ.हेडगेवार यांचे नाव


Nagpur News : गणेशोत्सवाच्या काळात सरकारकडून नागपूरकरांना एक अत्यंत महत्त्वाचे गिफ्ट मिळत आहे, आणि ते म्हणजे राज्यातील सर्वात लांब उड्डाणपूल (Nagpur Longest Flyover) उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारे तब्बल 8.9 किलोमीटर लांबीचे उड्डाणपुलाचे उद्घाटन आज (19 सप्टेंबर ) होत आहे. उत्तर नागपूरातील इंदोरापासून सुरू होणारे हे उड्डाणपूल दक्षिण नागपूरातील दिघोरी परिसरापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या माध्यमातून नागपूरकरांना थेट उत्तर नागपुरातून दक्षिण नागपूरपर्यंत कुठल्याही वाहतूक कोंडी शिवाय आणि अडथळ्यांशिवाय तीव्र गतीने जाणे शक्य होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी या सुमारे 998 कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडेल. या उड्डाणपूलामुळे नागपूरकरांना वाहतूक कोंडी पासून मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे हे उड्डाणपूल महाल परिसरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. Keshav Baliram Hedgewar) यांच्या घराच्या अगदी जवळून जातो. त्यामुळे या उड्डाणपुलाला डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती. शासनाकडून ही मागणी मान्य होऊन या उड्डाणपुलाला ‘डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल’ असे नाव दिले जाणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाची वैशिष्ट्य काय? (Features of the State’s Longest Flyover)

-उड्डाण पुलावर 998 कोटी रुपयांचा खर्च.

– प्रकल्पाची एकूण लांबी 8.9 कि.मी. आहे.

– उड्डाणपूल 12 मीटर रुंदीचा असून दोन्ही दिशेने वाहतूक करण्याच्या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे.

– उड्डाणपुलाची रचना ‘अल्ट्रा हाइ परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्सड काँक्रीट’ (Ultra High Performance Fiber Reinforced Concrete) तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे.

-उड्डाणपुलाच्या मार्गात दोन ROB व दोन RUB ही अंतर्भूत आहे.

-नवीन उड्डाण पूल बांधण्यासाठी पाचपावली येथील जुना ROB पाडून नवीन ROB बांधण्यात आला आहे.

-डागा मेमोरियल हॉस्पिटल येथे उभारण्यात येणारे चढ-उतार रॅम्प रुग्णालयात ये-जा करण्यासाठी सुलभ व सोयीस्कररित्या बांधण्यात आले आहे.

-या उड्डाण पुलावर अशोक चौक येथे खास चौक तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी उड्डाण पुलावरील चौकावर 5 दिशेने रस्ते उड्डाणपुलावर येऊन मिळतात.

-उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता ही विकसित करण्यात आला आहे.

-या उड्डाणपुलाच्या मार्गात नागपूरतील 3 प्रमुख आणि 11 छोटे चौक येतात या सर्व चौकांची वाहतूक कोंडीची समस्या या उड्डाणपूलामुळे सुटणार आहे.

-विशेष म्हणजे हे उड्डाणपूल महाल परिसरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या घराच्या अगदी जवळून जातो.

-त्यामुळे या उड्डाणपुलाला डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी होती.

-शासनाकडून ही मागणी मान्य होऊन या उड्डाणपुलाला ‘डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल’ असे नाव दिले जाणार असल्याची माहिती आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *