Raigad Crime News: रायगडमधील एक धक्कादायक घटना (Raigad News) समोर आली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 5 पैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात एका एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, एका महिन्यापूर्वीच म्हणजे 23 ऑगस्ट रोजी देखील म्हसळा तालुक्यात एका अनुसूचित जातीच्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामुळे एका महिन्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं प्रकरण काय? (Raigad Crime News)
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, तिच्या ओळखीच्या तरुणांनी तिला धमकावून आणि फसवून वारंवार अत्याचार केलं आहे. तसेच एप्रिल ते जून 2026 दरम्यान, पीडितेच्या घराचे बांधकाम करणाऱ्या एका 40 वर्षीय मिस्त्रीने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत जबरदस्तीने घरात शिरून अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी गु.र.नं. 131/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(ड), 376(2) आणि पोक्सो अधिनियम कलम 4, 6 अन्वये या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या पाच आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या घटनेचा अधिक तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सपोनि चव्हाण करत आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा: