Horoscope Today 18 September 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 18 सप्टेंबर 2026, आजचा दिवस अत्यंत खास आहे, आज गौरी पूजनाचा दिवस असल्याने हा दिवस देवी पार्वतीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या…
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यात उत्तम आकलन शक्ती असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल व्यसन असेल, तर ते काढून ठेवण्याचा प्रयत्न करा
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस नको त्या चिंता करू नये नोकरी व्यवसायात हाताखालचे लोक फसवण्याची शक्यता आहे, तेथे सावध रहा
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस पैशाच्या व्यवहारात तुमचे गणित बरेच वेळा चुकू शकते, म्हणून महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये एखाद्या व्यक्तीचे प्रकृती अस्वस्थ वस्तूंची दुरुस्ती किंवा पाहुणचार या कारणाने पैसे खर्च होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस महिलांनी अति विचार करू नये, तुमची वृत्ती स्वतंत्र असल्यामुळे नोकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे जमणार नाही
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात मनाविरुद्ध तडजोड करावी लागेल आणि तुम्हाला कमीपणा घ्यावा लागल्यामुळे त्याचा जास्त त्रास होईल
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस भाग्याची साथ मिळाल्यामुळे जीवनासंबंधीचा एकंदर दृष्टिकोन बदलेल, काही कारणामुळे भावना व सही होऊ शकता
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस तुमच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींना आनंदी आणि उत्साही कराल, घरामध्ये तुमचा चोखंदळपणा जाणवेल
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस कलेमध्ये प्राविण्य व नावलौकिक लाभेल, घरामध्ये तुमची सौंदर्य अभिरुची दाखवून द्याल
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस डोळ्याचे विकारासाठी योग्य वेळी औषधोपचार घ्यायला हवेत, महिला बौद्धिक क्षेत्रात चमकतील
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस कापड धंदा वाद्य वादन टेलरिंग कलेशी निगडित व्यवसाय उत्तम चालतील, दुसऱ्यांना उत्तम सहकार्य कराल
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस स्वतःची कामे सोडून लष्करच्या भाकरी भाजाल, परंतु याची दखल न घेतली गेल्यामुळे नाराजी पदरात पडेल.
हेही वाचा :
Gauri Avahan 2026: गौराईला काही ठिकाणी ‘महालक्ष्मी’ का म्हणतात? नेमकं कारण काय? परंपरा, धार्मिक महत्त्व जाणून घ्या…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)