आधी हरितालिका पूजन की आधी गणेश चतुर्थीचे पूजन ? पंचांगकर्त्यांचे म्हणणे काय ? – Marathi News | Haritalika Puja first or Ganesh Chaturthi Puja first? Almanack makers weigh in.


१४ सप्टेंबर २०२६ रोजी हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थीचे व्रत एकत्र आले आहे. अनेकजणांमध्ये हरतालिका आधी बसवायच्या की गणपती आधी बसवायचा असे कन्फ्युजन आहे. दोन्ही व्रत भिन्न आहेत त्याच प्रमाणे दोन्ही व्रताचे कर्ते देखील काही ठिकाणी भिन्न असू शकतात. हरतालिकेचे व्रत सुर्योदयानंतर प्रात: काळात एका मुहूर्तावर करावे ( यंदा तृतीया तिथी ) असे म्हटले आहे. सुर्योदयानंतर दोन तासात हरतालिकेचे व्रत करु शकता असे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे यांनी म्हटले आहे.

प्रत्येक व्रताचे काळ विहित काळ असतो. सुर्योदयापासून मघ्यान्ह काळ संपेपर्यंत म्हणजे अंदाजे दुपारी पावणे दोनपर्यंत गणपतीची पूजा करता येऊ शकते. पण गणपतीच्या विशेष पूजनासाठी विशेष काळ दिलेला आहे. त्यामुळे दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत गणेश पूजन करता येते.

हरतालिका बसवूनच गणपतीचे पूजन करावे असे काही नाही.तुम्ही आधी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करु शकता.नंतर हरतालिका पूजन करु शकता.हे दोन्ही व्रत भिन्न आहेत. त्यांचे कर्ते देखील भिन्न आहेत. अनेक ठिकाणी गणपती प्राणप्रतिष्ठा घरातील कर्ता पुरुष करीत असतो. काही ठिकाणी स्रिया देखील करतात. गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ठराविक काळ नसतो.मात्र गणशाच्या विशेष पूजेसाठी मध्यान्ह काळ सवा अकरा ते पावणे दोन या काळात गणेशाचे विशेष पूजन करावे असे म्हटले आहे.

हरतालिकाचे व्रत सुर्योदयानंतर प्रांतकाळात हरतालिकेची पूजा करुन करु शकता. सुर्योदयानंतर दोन तासात प्रात: काळात विशेष मुहूर्तावर हरितालिका करावी असे म्हटले जाते. यावेळी हरतालिकेचा तृतीया मुहूर्त आहे. या व्रतांचे आचरण शास्रशुद्ध पद्धतीने करु शकता. प्रत्येक सुर्योदयानंतर प्रात: काळात विशेष मुहूर्तावर हरितालिका करावी असे म्हटले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *