Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना


नवी मुंबई: नवी मुंबईतील दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र, नवी मुंबईत एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. घणसोली येथील सदानंद नावर या गोविदांचा मृत्यू झाला आहे. दहीहंडी दरम्यान 10 थर लावताना तो गोविंदा खाली पडल्याची प्राथमिक माहिती आहे. दहीहंडी उत्सवात आतापर्यंत एमएमआरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

नवी मुंबईतील दहीहंडीत गोविंदाचा मृत्यू 

नवी दिल्ली येथील देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना घडली आहे.  ऐरोलीत दहीहंडी फोडताना सदानंद नावर जखमी झाला होता. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपचारादरम्यान सदानंद नावर वय 35 याचा मृत्यू झाला आहे.  

ऐरोलीतील दहीहंडी फोडताना सदानंद नावर हा गोविंदा जखमी झाला होता.जखमी गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.  उपचारादरम्यान जखमी गोविंदाचा मृत्यू झाल्यानं बाल गोपाळांमध्ये शोककळा पसरली आहे. 

मुंबईच्या मालवणीत रुद्र कदम 7 वर्षाच्या गोविंदाचा मृत्यू 

दहीहंडी फोडताना मुंबईच्या मालवणी परिसरात 7 वर्षाच्या गोविंदावर सिमेंट ब्लॉक कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालवणी चिकूवाडी परिसरात आज दुपारी 3 च्या सुमारास झोपडपट्टीमध्ये लहान मुलं गल्लीत दहीहंडी खेळत होती. काही मुले स्वतःहून दहीहंडी साजरी करत होती; यासाठी दोरी एका झाडाला आणि तळमजल्यावरील बांधकामाच्या विटांच्या खांबाला (ब्रिक कॉलम) बांधण्यात आली होती.  हंडी फोडत असताना विटांचा खांब कोसळला आणि तो 7 वर्षांच्या रुद्र कदम या मुलाच्या डोक्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी मुलाला उपचारासाठी त्वरित मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पुण्यातील सांगवी येथे काल एका महिलेचा डॉल्बीचा लोखंडी सांगाडा डोक्यात पडून मृत्यू झाला होता. म्हणजेच मुंबई, नवी मुंबई आणि पुणे मिळून दहीहंडी उत्सवात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेक गोविंदा जखमी झाले आहेत. काही गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *