Fatima Sana – Shafali Verma : चल निघ येथून…! भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा ड्रामा; शेफालीच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने नको ते केलं, नेमकं काय घडलं? VIDEO


India beat Pakistan by seven wickets Women’s Asia Cup 2026 : क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आणि त्यात वाद झाला नाही, असं क्वचितच घडतं. महिला टी-20 आशिया कपमध्येही भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असंच काहीसं पाहायला मिळालं. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने भारतीय सलामीवीर शेफाली वर्माची विकेट घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनवरून सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेफाली वर्मा अवघ्या 6 चेंडूत 12 धावा करून बाद झाली. तिच्या खेळीत एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. फातिमा सनाने स्वतःच्याच गोलंदाजीवर शेफालीचा झेल घेतला आणि त्यानंतर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केलं. इतकंच नाही, तर फातिमाने हाताने शेफालीला ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाण्याचा इशाराही केला. मात्र, शेफालीने या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया न देता संयम कायम ठेवला. भारतीय खेळाडूने मैदानावर वाद वाढवण्याऐवजी शांत राहणं पसंत केलं. दुसरीकडे, सोशल मीडियावर मात्र चाहत्यांनी फातिमा सनाच्या या सेलिब्रेशनवरून तिच्यावर जोरदार टीका केली.

पाकिस्तानचा डाव 55 धावांवर ऑलआऊट

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा डाव पूर्णपणे कोलमडला. पाकिस्तानची संपूर्ण टीम 18.1 षटकांत अवघ्या 55 धावांवर ऑलआऊट झाली. भारताकडून श्री चरणीने शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत अवघ्या 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिच्यासोबत प्रेमा रावतनेही 3 विकेट्स घेत पाकिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली.

भारताचा 7 विकेट्सने दणदणीत विजय 

56 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही अपेक्षेप्रमाणे झाली नाही. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. मात्र, कमी धावसंख्येच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणतीही घाई केली नाही. हरमनप्रीतने 18 चेंडूत 18 धावांची संयमी खेळी केली. तिने दीप्ती शर्मासोबत संघाचा डाव सावरला आणि भारताला सहज विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. भारताने अखेर पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताकडून स्मृती मानधना 9 धावांवर, तर प्रतिका रावल 4 धावांवर बाद झाली. दीप्ती शर्मा 12 धावांवर नाबाद राहिली.

हे ही वाचा –

IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *