EPF vs NPS: महिन्याला 10,000 रुपयांच्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर कशात जास्त पैसा ? – Marathi News | EPF vs NPS: Which offers better post retirement benefits on a monthly investment of rs 10,000


निवृत्तीनंतर मोठा फंड तयार करण्याची प्रत्येक नोकरीपेशा व्यक्तीची गरज असते. यासाठी EPF ( Employees’ Provident Fund ) आणि NPS ( National Pension System ) दोन लोकप्रिय पर्याय आहेत. जर एखादा व्यक्ती ३० वर्षाच्या वयापासून दर महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर आणि दरवर्षी आपल्या गुंतवणूकीत ५ टक्के वाढ करत असेल तर ६० वयापर्यंत दोन्ही योजनेत चांगली रक्कम जमा होऊ शकते. मात्र, प्रश्न हा आहे की EPF आणि NPS दोन्ही योजनांपैकी कोण जास्त रिटायरमेंट कॉर्पस बनवू शकतो ? एका अंदाजानुसार NPS या बाबतीत पुढे दिसत आहे. कशी ते चला पाहूयात…

EPF चा रिटर्न

EPF च्या कॅलक्युलेशनसाठी गुंतवणूकदाराचे वय ३० वर्षे मानून तो ६० व्या वर्षी निवृत्त होईल असे म्हटले आहे. त्याचे बेसिक वेतन आणि डीए मिळून ८३,३३३ प्रति महिने आहे आणि कर्मचारी EPF मध्ये सुमारे ४.४ कोटी रुपयांचा अंदाजित कॉर्पस बनू शकतो. मात्र, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे की EPF चे व्याज दर सरकार द्वारा वेळोवेळी निश्चित केले जाते. आणि पुढील ३० वर्षे ती ८.२५ टक्के राहिल याची खात्री नसते.

NPS चे रिटर्न

आता NPS चा परतावा बाजारातील चढ उताराशी संबंधित असतो. गुंतवणूकदार त्यांच्या पैशाला इक्विटी, कॉर्पोरेट बाँड आणि सरकारी सिक्युरिटीज सारख वेगवेगळे एसेट क्लासमध्ये लागू शकते. येथे दिले गेलेल्या उदाहरणात एक्टिव्ह चॉईस (Active Choice)अंतर्गत ७५ टक्के इक्विटी आणि २५ टक्क सरकारी बाँडचा पर्याय मानला गेला आहे. NPS ट्रस्टच्या कॅल्युलेटर च्या अनुसार १२.७ टक्के रिटर्न मानल्यानंतर ३० वर्षात कॉर्पस सुमारे ५.३० कोटींवर पोहचू शकतो. म्हणजे दिलेल्या अंदाजानुसार NPS चा फंड EPF पेक्षा सुमारे ८६ लाख जास्त आहे.

मात्र, NPS मध्ये संपूर्ण रक्कम निवृत्तीच्या वेळी एका साथ काढणे शक्य नसते. अंदाजित ५.३० कोटी पैकी ६० टक्के सुमारे ३.१८ कोटी एकावेळी काढली जाऊ शकते. उर्वरित ४० टक्के रक्कम एन्युटी असते. जर एन्युटीवर सुमारे ६.७५ टक्के परतावा मानला गेला तर याने सुमारे १.१९ लाख प्रति महिना पेन्शन मिळू शकते. दुसरीकडे EPF मध्ये जमा रकमेवर घोषीत व्याजानुसार रिटायरमेंट फंड तयार होतो.

या तुलनेने हे स्पष्ट आहे की उच्च अंदाजित रिटर्नच्या कारणाने NPS चा संभाव्य कॉर्पस EPF हून मोठा दिसत आहे. परंतू NPS योजनेत बाजारातील जोखीम देखील असते. तसेच नियम, नोकरीची स्थिती आणि रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्नाची गरज लक्षात घेऊन EPF किंवा NPS ची निवड करणे गरजेचे असते. वरील कॅलक्युलेशन अंदाजे देण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *