Abhishek Sharma नवी दिल्ली : शेर ए पंजाब लीगला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मानं 77 धावांची खेळी केली आहे. अभिषेक शर्मानं सहज धवन याच्यासोबत शतकी भागीदारी केली. सहज धवन यानं 18 बॉलमध्ये 45 धावा केल्या. अमृत सूरमास संघानं 5.1 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या.
रमनदीप सिंह याच्या नेतृत्त्वातील मोहाली किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमृतसर सूरमासचा कर्णधार अभिषेक शर्मानं सहज धवन याच्यासोबत संघाला स्फोटक सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मा आणि सहज धवन या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अभिषेक शर्मानं नमन धीर सोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर नवव्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा बाद झाला तेव्हा अमृतसरच्या 142 धावा झाल्या होत्या.
296 च्या स्ट्राइक रेटनं 77 धावा
अभिषेक शर्मानं पॉवर प्लेच्या अखेरच्या बॉलवर चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 17 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. आयुष गोयलनं टाकलेल्या पाचव्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मानं जोरदार षटकार मारले. अभिषेक शर्मानं संपूर्ण डावात 7 षटकार आणि 6 चौकार मारले. अभिषेक शर्मानं 26 बॉलमध्ये 296 च्या स्ट्राइक रेटनं 77 धावा केल्या.
नमन धीर यानं देखील 22 बॉलमध्ये 5 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 47 धावा केल्या. मात्र, तो अर्धशत करु शकला नाही. तेजप्रीत सिंह यानं त्याला बाद केलं.
अमृतसर सूरमासच्या 258 धावा
अमृतसर सूरमास संघानं 19.5 ओव्हरमध्ये 258 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मोहाली किंग्जकडून अनमोल प्रित सिंह यानं 133 धावा आणि रमणप्रीत सिंह यानं 63 धावा केल्या.