लॉर्डस : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर सुरु असलेल्या कसोटीत देखील पाक फलंदाजांचा फ्लॉप शो सुरु आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम दुसऱ्या डावात देखील अपयशी ठरला आहे. बाबर आआझम यानं दुसऱ्या डावात 6 धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बचाव करताना बाबर आझम बाद झाला. पहिल्या डावात त्यानं केवळ 8 धावा केल्या होत्या.
लॉर्डस कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत
इंग्लंड विरोधात लॉर्डस कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत आहे. इंग्लंडनं पाकिस्तानसमोर विजयाचं 389 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. बाबर आझम दुसऱ्या डावात 6 धावा करुन बाद झाला. त्यानं दुसऱ्या कसोटीत केवळ 14 धावा केल्या. लॉर्डस कसोटीच्या दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाबर आझम 6 धावा करुन बाद झाला. पहिल्या डावात बाबर आझम अपयशी ठरला होता. बाबर आझम यानं शेवटचं शतक 2022 मध्ये न्यूझीलंड विरोधात केलं होतं. म्हणजे बाबर आझमला गेल्या चार वर्षात शतक करता आलेलं नाही.
दुसऱ्या डावात पाकिस्तानचा निम्मा संघ बाद
पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 110 धावांवर बाद झाला होता. दुसऱ्या डावात देखील पाकिस्तानच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. अजान अवैस 6 धावा करुन बाद झाला. ओली रॉबिन्सन बाद झाला. अब्दुल्ला शफीकला खातं उघडता आलं नाही. एकाच ओव्हरमध्ये रॉबिन्सननं दोन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात पाकिस्ताननं 6 बाद 146 धावा केल्या आहेत.
इंग्लंडनं पहिल्या डावात 290 धावा केल्या होत्या, तर पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 110 धावावंर बाद झाला. इंग्लंडला पहिल्या डावात 180 धावांची आघाडी मिळाली होती. तर, दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 208 धावांवर बाद झाला. यामुळं पाकिस्तानला विजयासाठी 389 धावांचं लक्ष्य आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डेन लॉरेन्स यानं सर्वाधिक 54 धावा केल्या. तर, हॅरी ब्रुक यानं 34 आणि एमिलियो यानं 31 धावा केल्या. जो रुट यानं 24 धावा केल्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास यानं 57 धावा देत 5 विकेट घेतल्या.दरम्यान, इंग्लंडनं लीडस येथे झालेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला एक डाव आणि 103 धावांनी पराभूत केलं होतं.