Rajiv Thakur Loses Father: ‘द कपिल शर्मा’शोमधून (The Kapil Sharma) प्रसिद्ध मिळवणारा कलाकार आणि कॉमेडियन राजीव ठाकूर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आपल्या घरातील मुख्य व्यक्तीला गमावले आहे. राजीव ठाकूरच्या डोक्यावरून वडिलांचे छप्पर (Rajiv Thakur) हरपले आहे. राजीव ठाकूरच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेसृष्टीतून (Entertainment) शोक व्यक्त केला जात आहे. सेलिब्रिटी तसेच चाहते, राजीव ठाकूरच्या वडिलांवर अनेकांनी श्रध्दांजली वाहिली. सोशल मीडियातून त्यांच्यावर श्रध्दांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना करत आहेत.
राजीव ठाकूरच्या वडिलांच्या निधनाची बातमी, अभिनेत्याचा जवळचा मित्र आणि सहकलाकार, कृष्णा अभिषेकने दिली. खरंतर, कृष्णा अभिषेक आणि राजीव ठाकूरला एकत्र इंदूर येथील एका इव्हेंटमध्ये एकत्र परफॉर्म करायचे होते. पण, राजीव ठाकूर यांचे वडील श्रवण कुमार यांच्या निधनानंतर राजीव ठाकूरने इव्हेंटमध्ये परफॉर्म करणं कॅन्सल केलं. कृष्णाने इव्हेंटच्या ऑर्गनायझरसोबत एक व्हिडीओ शूट करुन शेअर केला, तसेच या व्हिडीओतून राजीव ठाकूरच्या वडिलांच्या निधनाबाबत माहिती दिली.
कृष्णाने व्हायरल व्हिडीओमध्ये नक्की काय सांगितलं? (The Kapil Sharma Show Comedian Rajiv Thakur)
कृष्णाने सांगितलं की, तो खास इव्हेंटसाठी इंदूरला पोहोचला आहे. पण राजीव ठाकूरच्या वडिलांचे निधन झाले आहे, असं त्याने व्हिडीओत सांगितलं. त्यांनी या कार्यक्रमासाठी तिकीट खरेदी केलेल्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच इव्हेंटची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं कृष्णाने व्हिडीओतून सांगितलं. राजीव ठाकूर हा आपल्या आई – वडिलांच्या अत्यंत जवळ होता. तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर आई – वडिलांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण शेअर करत असतो.
मागच्या वर्षी म्हणजेच 2025 साली त्याने आपल्या आई – वडिलांचा लग्नाचा 70 वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. त्याने या खास कार्यक्रमातील फोटो आणि आपल्या आई – वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. दरम्यान, राजीव ठाकूरच्या वडिलांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राजीव ठाकूर किंवा त्यांच्या कुटुंबाकडून त्याच्या वडिलांच्या निधनाबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. राजीव ठाकूरने अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. दरम्यान, वडिलांच्या निधनामुळे राजीवसह संपूर्ण ठाकूर कुटुंब अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: